पक्ष कोणताही असो आमचा उमेदवार मराठीच असला पाहिजे” ;- महाराष्ट्र संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य रजि.

Spread the love

आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह-महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरां-मधला मराठी टक्का आपण पाहतच आहोत दिवसेंदिवस घसरतंच चाललाय? आणि परराज्यातून आलेला अमराठी परप्रांतीय टक्का कमी न होता प्रमुख शहरे हळूहळू गिळंकृत करत करत अजगराच्या विळख्यासारखा आपल्या प्रमुख शहरांमध्ये वाढतंच चाललाय!‌

स्वार्थी आणि मतांसाठी लाचार असलेल्या आपल्या आवडत्या राजकीय पक्षांनी तर मराठी विषयाला कधीच तिलांजली दिलेली आहे हे आपल्या सुज्ञ मराठी जनतेला लक्षात आलेले दिसत नाही.मग आता ह्या महाराष्ट्र राज्यावर होणारे परकीय आक्रमण, घूसखोरी, परप्रांतीय लोंढे त्यामुळे स्थानिक पोलिस प्रशासन, सरकारी योजना, वाहतूक व्यवस्था, रहदारी यावर वाढलेला हा अतिरिक्त ताण आणि ह्या परप्रांतीय लोंढ्यामुळे मराठी माणसांना होत असलेल्या शारीरिक-मानसिक त्रासासह ह्या परप्रांतीय लोंढ्यावर आवर कसा घालता येईल आणि घालणार कोण?

आपल्या मराठी राज्यात हिंदी भाषेचा वाढता अतिरेक थांबवायचा कसा? मराठी शाळा वाचवायच्या कशा?अनधिकृत फेरीवाल्यांपासून फूटपाथ कसे मोकळे करता येतील?आस्थापने तसेच दुकानांवरील मराठी पाट्या ह्या सक्तीच्या आहेत त्यावर अंमलबजावणी का होत नाही आहे? सरकारी योजना, नोकऱ्या, उद्योग-धंदे यावर पहिला हक्क येथील स्थानिक भुमिपुत्रांचाच असला पाहिजे आणि आपले हे राज्य मराठी तर महाराष्ट्र राज्यातील मंत्रिमंडळासह, विधानसभेतील, महानगर पालिकेतील प्रशासकीय अधिकारी तसेच मंत्रीगण, खासदार, आमदार, नगरसेवक हे कायद्याने मराठीच असले पाहिजेत म्हणून “पक्ष कोणताही असो आमचा उमेदवार मराठीच असला पाहिजे” या मराठी माणसांच्या मागणीला पक्षप्रमुखांचे लक्ष कसे अधोरेखित करता येईल?

अशा आणि अनेक मराठी माणसांच्या हिताच्या काही प्रमुख मागण्यांवर मराठी भाषा जतन संवर्धन आणि संरक्षण करणाऱ्या मी मराठी एकीकरण समिती नोंदणीकृत संलग्न असलेल्या महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या माध्यमातून आज रविवार दिनांक:-१३/८/२०२३ रोजी बोरीवली पुर्व येथील सभागृहात संघटनेत कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांचा गेट-टुगेदर एक कार्यक्रम ठरवून कार्यकर्त्यांमध्ये संघटना वाढीस त्याचबरोबरीने संघटना बळकटीसाठी एक चर्चासत्र घडवून सहभोजन आणि चहापाण्यासह आजचा हा चर्चेसत्रेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. जय महाराष्ट्र
मी मराठी, बोली मराठी, जय मराठी!

– रविंद्र शिंदे (उपाध्यक्ष)
मी मराठी एकीकरण समिती नोंदणीकृत संलग्न महाराष्ट्र संरक्षण संघटना महाराष्ट्र राज्य रजि.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page