
रत्नागिरी- भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा दक्षिण माननीय जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली डेपो मॅनेजर राज्य मार्ग परिवहन रत्नागिरी आगार यांना आज महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांच्या बस सुविधांबाबत एसटी महामंडळ वाहतूक व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या समस्या संदर्भात सविस्तर चर्चा यावेळी डेपो मॅनेजर यांच्याशी करण्यात आली व लवकरात लवकर तोडगा काढण्याचे ही जिल्हाध्यक्षांनी यावेळी डेपो मॅनेजर यांना सांगितले.

त्यावेळी उपस्थित ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते लेले सर, विक्रम जैन, बाबू सुर्वे, शैलेश बेर्डे, मंदार खंडकर, प्रवीण देसाई, नितीन जाधव, अशोक वाडेकर, दादा ढेकणे, मनोर दळी इत्यादी उपस्थित होते…