रत्नागिरी : एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यातील कासारवेली शाळेत गेलेल्या माजी आमदार बाळ माने, दि यश फाउंडेशनच्या सहव्यवस्थापकीय विश्वस्त सौ. माधवीताई माने यांनी मुलांसोबत खाली बसून पोषण आहारचा आस्वाद घेतला. यामुळे मुलांनाही आनंद झाला.
माजी आमदार बाळ माने यांच्या दि यश फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमानंतर पोषण आहाराची वेळ झाली असल्याने श्री. माने व सर्व पाहुण्यांनी पोषण आहार घेतला. पाहुण्यांसाठी टेबल खुर्च्यांवर पोषण आहाराची व्यवस्था करण्यात येत असताना बाळासाहेब माने यांनी विद्यार्थ्यांसोबतच पोषण आहार घेऊ, असे सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांसोबत बैठकांची व्यवस्था करून लगेचच पोषण आहार देण्यात आला.
आमटी- भात हो पोषण आहार खूपच लज्जतदार असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब माने यांनी व्यक्त केली. तसेच पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचे कौतुक माधवताई माने यांनी केले. सरपंच वेदिका बोरकर, माजी सरपंच अनुराधा सुवरे, माजी सरपंच अनघा लाकडे, माजी ग्रामपंचायत सदस्य अभय लाकडे यांनीही पोषण आहार घेतला
जाहिरात