मुंबई- मुंबईतून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसमधून तरुणीला फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दादर रेल्वे स्टेशनवर ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीला दादर रेल्वे पोलीसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवर पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेस ट्रेनमधून २९ वर्षीय तरुणीला फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उद्यान एक्स्प्रेसमधल्या लेडीज डब्यातील हा प्रकार घडला आहे. काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दारूच्या नशेत हल्लेखोराने २९ वर्षीय तरुणीला ट्रेनमधून फेकल्याची माहिती मिळत आहे. धावत्या एक्स्प्रेस ट्रेनमधून तरुणीला फेकल्याने रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दादर स्टेशनच्या प्लॅटफॅार्मवर उद्यान एक्स्प्रेस ट्रेन काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास आली. एक्स्प्रेस ट्रेन आल्यानंतर जनरल लेडीज डब्यातील सर्व महिला उतरल्या. मात्र, पीडित तरूणी एकटीच डब्यात होती. या एकट्या तरुणीला पाहून हल्लेखोर डब्यात चढला. यावेळी तरूणीने त्याला प्रतिकार केला.
झटापटीत हल्लेखोराने धावत्या ट्रेनमधून फेकून दिले. सुदैवाने ती प्लॅटफॅार्मवर पडल्याने पडली आणि जखमी होवून बेशुद्ध पडली. या घटनेमुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दारुच्या नशेत कृत्य करणाऱ्या हल्लेखोराला सीएसटी रेल्वे स्टेशनवरून अटक केली आहे. तसेच पोलिसांनी या हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.