नितीन देसाई अनंतात विलीन; एन. डी. स्टुडिओमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार..

Spread the love

कर्जत- लोकप्रिय कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं असून आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन देसाई यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या एन. डी. स्टुडिओमध्येच शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी मानवंदना दिली. यावेळी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांबरोबरच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

एन. डी स्टुडिओचे निर्माते, लोकप्रिय कला दिग्दर्शक नितीन देसाई आज पंचत्वात विलीन झाले आहेत. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमाच्या सेटवर नितीन देसाईंनी आत्महत्या केली होती. जोधा अकबर’ सिनेमाच्या सेटवर नितीन देसाई यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. नितीन चंद्रकांत देसाईंच्या पार्थिवावर एन. डी. स्टुडिओमध्ये अंत्यसंकार पार पडले. नेते आणि अभिनेत्यांनी अंत्यदर्शन घेतलं. दरम्यान मधुर भांडारकर, रवी जाधव, शिवसेना नेते शिशिर शिंदे यांनी देसाईंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.

तसेच राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले आणि भाजप नेते विनोद तावडे यांनी देखील एन. डी. स्टुडिओमध्ये अंत्यदर्शन घेतलं. मराठी सिने सृष्टीतील सुबोध भावे, मानसी नाईक, निखिल सानेदेखील अंत्यदर्शनासाठी आले होते. नितीन देसाई यांनी आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. नितीन देसाई यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, एक भाऊ आणि बहीण आहे. नितीन देसाई यांना अखेरचा निरोप देताना सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीदेखील भावूक झाल्या होत्या

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page