रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेल्या २४ वर्षीय बेपत्ता युवतीचा मृतदेह दाभोळ समुद्रकिनारी

Spread the love

रत्नागिरी ; रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेल्या २४ वर्षीय बेपत्ता युवतीचा मृतदेह दाभोळ समुद्रकिनारी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोन दिवसांपूर्वी तिच्या घरच्यांनी दापोली पोलीस ठाण्यात आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. दापोली येथून चिपळूण तालुक्यात ओमळी या आपल्या गावी जाते सांगून निघालेल्या नीलिमा सुधाकर चव्हाण हिचा बुडून झालेला मृत्यू हा नेमका कशामुळे झाला हे गूढ अद्याप कायम आहे.दापोली येथून निघालेली नीलिमा चव्हाण अद्याप घरी न पोहोचल्याने तिची सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. त्यानंतर तिच्या भावाने दापोली येथील तिच्या एका जवळच्या मैत्रिणीला फोन लावला. त्यावेळेला तिने नीलिमा मी गावी ओमळी येथे जाते आहे असे सांगून निघाली आहे अशी माहिती दिली. दरम्यान, बेपत्ता झालेल्या नीलिमा हिचे शेवटचे लोकेशन खेड असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. तिच्या घरच्यांनी चिपळूण परिसरातही नीलिमा हिची शोधाशोध केली. मात्र ती कुठेच सापडली नाही.
दापोली येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कंत्राटी कर्मचारी निलीमा सुधारकर चव्हाण (वय २४ रा. ओमळी, ता. चिपळूण) या शनिवार दि. २९ जुलैपासून बेपत्ता झाल्याने दापोली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.
शनिवारी सकाळी नऊच्या दरम्यान ती मैत्रिणीला सांगून दापोली शहरा जवळ असलेल्या जालगाव लष्करवाडी येथून येथून निघाली होती. शनिवारी दोन दिवस सुट्टी असेल तेव्हा ती नेहमी आपल्या गावी जात असे इतकेच नव्हे तर २८ जुलै रोजी शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान तिने आपला भाऊ अक्षय याला कॉल करून मी सकाळी गावी येणार आहे असेही कळवले होते. या सगळ्या प्रकारामुळे चिपळूण व दापोली तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page