१ ऑगस्ट/रत्नागिरी– रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या इतिहासात प्रथमच निवडणुकीने सदस्यांची निवड करण्यात आली. या निवडणुकीत श्रीमान भागोजीशेठ कीर पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले. निवडणुक निकालानंतर घेण्यात आलेल्या पदाधिकारी निवड सभेत राजीव कीर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी कांचन मालगुंडकर महिलाउपाध्यक्ष पदी ॲड.प्रज्ञा तिवरेकर, सचिव पदी चंद्रहास विलणकर, सहसचिव अमृता मायनाक, खजिनदारपदी राजेंद्र विलणकर, सहखजिनदारपदी विजय बिर्जे यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्यपदी दिलीप भाटकर, अस्मिता चवंडे, सदानंद मयेकर, अनंत भाटकर, निलेश बिर्जे, दीपक तोडणकर, भालचंद्र नागवेकर, आदेश भाटकर, अशोक भाटकर, संतोष मयेकर, स्वप्नील सुर्वे, अनिरुद्ध भुते, आनंद भाटकर, नितीन तळेकर यांची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.