यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर

Spread the love


दिल्ली ; यंदाच्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. रोहित टिळक यांनी ही घोषणा केली आहे. पुण्यात होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितीत राहणार आहे.
1 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे 1 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी शरद पवारांना देखील आमंत्रण देण्यात येणार असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं आहे. त्यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थितीत राहणार आहेत. त्यामुळे सत्तानाट्यानंतर पहिल्यांदात राजकीय नेत्यांची मोठी फळी या कार्यक्रमासाठी एकाच मंचावर येणार आहेत

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page