शनिवार दि. २४ जून रोजी Modi At 9 अभियानांतर्गत नवमतदार युवती मेळाव्याचे भाजपा रत्नागिरी (द.) च्या वतीने आयोजन करण्यात आले.

Spread the love

रत्नागिरी : आज शनिवार दि. २४ जून रोजी Modi At 9 अभियानांतर्गत नवमतदार युवती मेळाव्याचे भाजपा रत्नागिरी (द.) च्या वतीने आयोजन करण्यात आले. रत्नागिरीतील गुरुकृपा मंगल कार्यालयात झालेल्या या भव्य कार्यक्रमात नवमतदार युवतींना भाजपा सरकारने त्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने मागील ९ वर्षांतील केलेल्या कामाचा गोषवारा उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितला.

“आज मुली समाजात ताठ मानेने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वावरत आहेत. जोपर्यंत तुमच्यापैकी युवती राजकीय क्षेत्रात कर्तृत्व गाजवणार नाहीत तोपर्यंत महिलांचे सबलीकरण पूर्ण झाले असे म्हणता येणार नाही. Bharatiya Janata Party (BJP) तुम्हा सर्वांना खुणावत आहे. तुमचे विचार कृतीतून व्यक्त करण्यासाठी एक मंच प्रदान करत आहे. तुम्ही सर्व नवमतदार आहात. २०१४ पूर्वीच्या राजकारणापासून अनभिज्ञ आहात. अभ्यासाचा विषय म्हणुन एकदा सखोल वाचन करा. मागील ६०-६५ वर्षे आणि आत्ताची ९ वर्षे यातील फरक तुमच्या लक्षात येईल. आज देशाचे पंतप्रधान मा. Narendra Modi जी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर जितका सन्मान प्राप्त होत आहे तितका आजवरच्या इतिहासात कोणालाही मिळाला नाही. Social Media वर याबाबत मतमतांतरे असतील पण योग्य इतिहासाचे वाचन, मनन, चिंतन करणे तुमची जबाबदारी आहे. BJP Maharashtra मध्ये तुमचे सदैव स्वागत आहे. ९ वर्षांच्या सुशासन काळाला समर्थन देण्यासाठी आपल्या मोबाईलवर ९०९०९०२०२४ हा नंबर डायल करा आणि मिस्ड कॉल द्या.”

या कार्यक्रमासाठी भाजपा – रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ मधील युवती लक्षणीय संख्येने उपस्थित होत्या. प्रा. वर्षाताई भोसले, सौ. माधवी माने, सौ. ऐश्वर्याताई जठार, सौ. शिल्पाताई मराठे, सौ. संपदाताई तळेकर, सौ. पल्लवीताई पाटील आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page