रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे ‘पठाण’ , पण IMDbवर मिळाली ‘इतकीच’ रेटिंग

Spread the love

शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट सर्व गदारोळानंतरही चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. मात्र रिलीजच्या दिवशीही अनेक ठिकाणी या चित्रपटाला प्रचंड विरोध झाला. काही ठिकाणी ‘पठाण’चे पोस्टर फाडण्यात आले, तर काही ठिकाणी चित्रपटाचा पहिला शो रद्द करण्यात आला. मात्र, एवढे होऊनही ‘पठाण’वर काहीही परिणाम झालेला नाही. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने प्रभासचा ‘बाहुबली’, यश स्टारर ‘केजीएफ २’ आणि अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ यांचे रेकॉर्ड मोडले आहेत. तर मग जाणून घेऊया की, पहिल्याच दिवशी कमाईचा विक्रम मोडणाऱ्या या चित्रपटाला IMDb वर किती रेटिंग मिळाले आहे.

‘पठाण’ने पहिल्याच दिवशी ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. लोक थिएटरमध्ये वेड्यासारखे नाचत आहेत. लोकांना हा चित्रपट खूप आवडला आहे, परंतु IMDb वर या चित्रपटाचे रेटिंग पाहून चाहत्यांची निराशा होऊ शकते. IMDb वर सिद्धार्थ आनंदच्या या चित्रपटाला सरासरी ६.८ रेटिंग मिळाली आहे. या चित्रपटाला ४९.३ टक्के लोकांनी १० रेटिंग दिले आहे. ५.६ टक्के लोकांनी ९, तर ३.२ टक्के लोकांनी ८ असे रेटिंग दिले आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ३४.३ टक्के लोकांनी या चित्रपटाला १ रेटिंग दिले आहे.

पहिल्या दिवशी ‘पठाण’ने देशभरातील सर्व भाषांमध्ये ५२.५० कोटींचा गल्ला केला. दोन दिवसांत हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा पार करेल अशी आशा आहे. ‘पठाण’साठी येणारा वीकेंड देखील छान असेल. रिपोर्टनुसार, हा चित्रपट चार दिवसांत २०० कोटींचा आकडा पार करू शकतो.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page