बुलढाण्यातील बोरी अडगाव येथे सशस्त्र दरोडा; चोरट्यांनी वार केल्याने एकाच कुटुंबातील चार जण जखमी

Spread the love

बुलढाणा- बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथून दोन किलोमीटर अंतरावर शेतात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरी ५ ते ६ जणांनी सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. यामध्ये दरोडेखोरांनी लाठ्या, लोखंडी पाईप आणि चाकूने वार केल्याने एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. तर एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अकोला येथे हलवण्यात आले आहे.

तायडे कुटुंब बाळापूर रोडवर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर शेतामध्ये राहते. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानकपणे ५ ते ६ जणांनी हातामध्ये काठ्या, चाकू व इतर साहित्य घेऊन घरामध्ये प्रवेश करत मारहाण सुरू केली. त्यामुळे गौरव आणि त्याच्या भावाने विरोध केला असता चोरट्याने दोघांसह घरातील महिलांनाही मारहाण करत रोख रक्कम व गळ्यातील सोन्याची पोत तोडून जवळपास अंदाजे एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यामध्ये चार जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सदर घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस घटनस्थळी पोहोचले होते. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच दहशत पसरली आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page