सेन्सेक्स, निफ्टीत विक्रीचा जोर
मुंबई: शेअर बाजाराची सुरुवात आज घसरणीनं झाली. पण, त्यानंतर काही काळतच बाजारात मोठी विक्री झाल्याचं पाहायला मिळालं. शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीचे निर्देशांक आज घसरणीसह खुले झाल्याचं पाहायला मिळालं. आज आशियाई बाजारातून संमिश्र संकेत मिळत आहेत, परंतु रशियन बाजारात जोरदार तेजी दिसून येत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त काल देशांतर्गत शेअर बाजार बंद होते. मात्र आज बाजारातील ट्रेडिंगसाठी संकेत खूपच वाईट आहेत. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आजही मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अदानी समुहाच्या शेअर्समधील घसरणीमुळे देशांतर्गत शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळत आहे.