*काठमांडू-* नेपाळमधील नुवाकोटमध्ये हेलिकॉप्टर कोसळले असून या दुर्घटनेत ५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रसुवाला येथे जात असताना या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. यामध्ये चार चिनी नागरिकांचाही सहभाग होता. गेल्या महिन्यात नेपाळमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कोसळून १८ जणांचा मृत्यू झाला होता.
त्यानंतर आता हेलिकॉप्टर कोसळल्याने पुन्हा अपघात झालाय. खराब व्यवस्थापनामुळे नेपाळमध्ये विमान अपघात होत असल्याचा आरोप होत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमधील नुवाकोटमधील शिवपुरी भागात हे हेलिकॉप्टर कोसळले. एअर डायनेस्टीचे हे हेलिकॉप्टर होते. पण विमानातील सर्व ५ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एका सूत्राने हिमालयन टाईम्सला सांगितले की, हेलिकॉप्टर काठमांडूहून निघाले होते.
पण रस्त्यातच ते क्रॅश झाले. शिवपुरी राष्ट्रीय उद्यानात बुधवारी दुपारी हे हेलिकॉप्टर कोसळलाची माहिती पुढे आली आहे. नेपाळ पोलिसांच्या प्रवक्ते डीआयजी दान बहादूर कार्की यांनी सांगितले की, हेलिकॉप्टरमधील पाचही जणांचा मृत्यू झाला आहे. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे प्रवक्ते सुभाष झा म्हणाले की, एअर डायनेस्टीच्या 9N-AZD हेलिकॉप्टरने काठमांडू येथून दुपारी 1:54 वाजता स्याप्रुबेसी, रसुवा येथे उड्डाण केले. कॅप्टन अरुण मल्ला हे या हेलिकॉप्टरचे पायलट होते.