
*देवरूख-* राष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कुल, देवरुखच्या ६ विद्यार्थ्यांनी उत्तम गुण संपादन करत गुणवत्ता यादीत स्थान पटकवले आहे.
या गुणवत्ता यादीत इयत्ता 8 वीतील सोहम पर्शराम, सई पवार, समर्थ लेंडवे, श्रावणी कदम, अंतरा गोपाळ, गौरी मोरे यांनी स्थान मिळवले आहे. या विद्यार्थ्यांना दरवर्षी 12000 रुपये प्रमाणे चार वर्षात एकूण प्रत्येकी 48000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. सदर परीक्षेकरिता विदयार्थ्यांना शिक्षक श्री दिनेश गणपत्ये, श्री भरत धनपाल, श्री मंगेश रसाळ, श्री कौस्तुभ जोशी यांचे मार्गदर्शन मिळाले. विद्यार्थ्यांच्या या उत्तम यशाबद्दल शाळा समिती अध्यक्षा सौ नेहाताई जोशी, मुख्याध्यापक श्री मधुकर कोकणी, पर्यवेक्षक श्री अनंत कुमार मोघे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.