
*मुंबई-* गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाली असून युवासेनेचे 10 पैकी 10 उमेदवार विजयी झाले आहेत. राखीव प्रवर्गातील पाच जागा, तसेच इतर पाच जागांवर ठाकरेंच्या युवासेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत.
इतर मागासवर्गीयमध्ये मयूर पांचाळ, महिला प्रवर्गातून स्नेहा निलेश गवळी, अनुसूचित जाती प्रवर्गातून शितल शेठ, अनुसुचित जमाती प्रवर्गातून डॉ. धनराज कोहचाडे, व्हीजेएनटी प्रवर्गातून शशिकांत झोरे यांचा विजय झाला आहे. ओबीसी प्रवर्गातून मयूर पांचाळ यांना 5 हजार 350 मते मिळाली आहेत.
काय म्हणाले वरूण सरदेसाई?…
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत राखीव पाचही जागांवर युवासेनेच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. ओबीसी गटातून मयुर पांचाळ, शेड्युल्ड ट्राईब गटातून धनराज कोचाडे, महिला गटातून स्नेहा गवळी, शेड्युल्ड कास्ट गटातून शितल शेठ, एनटी गटातून शशिकांत झोरे या पाय उमेदवारांनी जवळपास पाच-पाच हजार मते घेतली आहेत. तर आमच्या प्रतिस्पर्धी अभाविप यांच्या उमेदवारांनी 800 ते 1000 मते घेतली आहेत. असे माहिती सरदेसाई यांनी सांगितली.
भाजप, अभाविपचा रडीचा डाव…
कल्पेश भोईर यांच्या विरोधात अभाविप कोर्टात गेले आहेत यावर वरूण सरदेसाई म्हणाले की, काही झाले तरी रडीचा डाव करण्याचा सरकार, भाजप, अभाविप करण्याचा प्रयत्न करत आहे. कालही त्यांनी हायकोर्टात जाऊन सिनेटच्या निकालाल स्थगिती देण्याची मागणी केली होती. पण हायकोर्टाने ती मागणी फेटाळून लावली. आज देखील थातूरमातूर केस बनवून आमच्या उमेदवाराच्या विरोधात कोर्टात गेले. पण हे प्रकरण अर्जंट नसल्याचे कोर्टाने म्हटले आणि या प्रकरणाच्या सुनावणीसाठी दोन आठवड्यांनंतरची तारीख दिली. त्यामुळे आजचा निकाल विद्यापीठ व्यवस्थित जाहीर करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
युवासेना आणि अभाविपमध्ये थेट लढत…
मुंबई विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधारकांच्या जागांकरिता 24 सप्टेंबर 2024 रोजी मतदान झाले होते. सध्या मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाची युवासेना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात थेट लढत होत आहे.
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक उमेदवार…
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या रिंगणात एकूण 28 उमेदवार आहेत. यामध्ये ठाकरेंची युवा सेना आणि अभाविपचे दहा जागांवर दहा उमेदवार आहेत. तर, इतर आठ उमेदवार आहेत.
अभाविप उमेदवारांची नावे…
1) हर्षद भिडे (खुला वर्ग)
2) प्रतीक नाईक (खुला वर्ग)
3) रोहन ठाकरे (खुला वर्ग)
4)प्रेषित जयवंत (खुला वर्ग)
5) जयेश शेखावत (खुला वर्ग)
6) राजेंद्र सायगावकर (एससी)
7) निशा सावरा (एसटी)
8) राकेश भुजबळ ( ओबीसी)
9) अजिंक्य जाधव (व्हीजेएनटी)
10) रेणुका ठाकूर(महिला)
ठाकरेंच्या युवा सेनेचे उमेदवार…
1) प्रदीप सावंत (खुला वर्ग)
2) मिलिंद साटम(खुला वर्ग)
3) परम यादव (खुला वर्ग)
4) अल्पेश भोईर (खुला वर्ग)
5) किसन सावंत. (खुला वर्ग)
6) स्नेहा गवळी- (महिला)
7) शीतल शेठ – (एससी)
8) मयूर पांचाळ – (ओबीसी)
9) धनराज कोहचडे -(एसटी)
10) शशिकांत झोरे – (एनटी)
एकूण इतर आठ उमेदवार अपक्ष आहेत..
1) रोहित ढाले (खुला वर्ग)
2) सुधाकर तांबोळी (खुला वर्ग)
3) संजय वैराळ (खुला वर्ग)
4) जितेंद्र म्हात्रे (खुला वर्ग)
5) मोहम्मद इरफान अन्सारी (खुला वर्ग)
6) भूषण गांगडा (एसटी)
7) सनील मोसेकर (ओबीसी)
8) महेश सातपुते (व्हीजेएनटी)