विविध कार्यक्रम-उपक्रमांनी युवा नेते,पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा वाढदिवस होत आहे साजरा…

Spread the love

पनवेल : विविध कार्यक्रम-उपक्रमांनी
युवा नेते,पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा वाढदिवस साजरा होत आहे.

पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांचा 16 जानेवारी 2024 रोजी वाढदिवस आहे .या वाढदिवसाचे औचित्य साधून शेकाप आणि विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक ,सांस्कृतिक,आरोग्य आणि क्रीडा विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार 14 जानेवारीला शेतकरी कामगार पक्ष पनवेलच्या पुढाकाराने व्ही.के.हायस्कूलच्या भव्य पटांगणावर सकाळी 11 वाजल्यापासून महिला आणि पुरुष गटातील कबड्डी सामन्यांचा थरार पनवेलकरांना पाहायला मिळाला.सकाळी आठ वाजता याच ठिकाणी चित्रकला स्पर्धेचे आयोजन जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

शेतकरी कामगार पक्ष उलवे नोड:-2, आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि महिला मंडळ सेक्टर 8/9/10 रहिवाशी संघटना,आम्ही कोकणकर संघटना यांच्या माध्यमातून कोपर तलाव,सेक्टर :-8 उलवे येथे मोफत आरोग्य शिबीर, मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन,ओपन जिमचे भुमिपुजन,बस थांबा व वाचनालय उद्घाटन अशाप्रकारे विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.

सोमवार 15 जानेवारीला रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन आणि आर झुनझुनवाला – शंकरा आय हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन जे.एम.म्हात्रे यार्ड, शिवमंदिर (पळस्पे) शेजारी, जयवंत हॉटेल समोर,पळस्पे फाटा,पनवेल येथे सकाळी 10:00 ते दुपारी 2:00 या वेळेत करण्यात आले आहे,याविषयी अधिक माहितीसाठी 9112279000 / 7506418622 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आयोजकांकडून सांगण्यात आले.

सोमवार दिनांक 15 जानेवारी रोजी सायंकाळी 5.00 वाजता मोफत आयुष्यमान कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन शेतकरी कामगार पक्ष – खांदा कॉलनी यांच्यातर्फे देवी आंबा माता मंदिर, सेक्टर १३, खांदा कॉलनी येथे करण्यात आले आहे अशी माहिती मा.उपनगराध्यक्ष श्री गणेश पाटील यांनी दिली.

16 जानेवारी रोजी सायंकाळी 6:00 वाजता व्ही. के. हायस्कूल येथे जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून नववर्ष सुगंध संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक ऋषीकेश रानडे,मधुरा दातार,चैतन्य कुलकर्णी,रसिका गानू हे आपल्या स्वरांनी मंत्रमुग्ध करण्यासाठी पनवेलमध्ये येणार आहेत.या कार्यक्रमात हार्मोनियम आणि संगीत संयोजन पराग माटेगांवकर करणार आहेत तर सिनेअभिनेते विघ्नेश जोशी हे निवेदन करणार आहेत.या दिवशी सुरुवात सोडू नका आणि शेवट चुकवू नका असे आवाहन श्री दिलीप पाटील यांनी केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page