तू सानियाचा विश्वासघात केलास!! दुसरं लग्न करताच मलिकला नेटकऱ्यांनी धुतलं…

Spread the love

पाकिस्ताचा माजी क्रिकेटपटू आणि सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक (Shoaib Malik) याने सर्वाना आश्चर्याचा धक्का देत दुसरं लग्न केलं आहे. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदला (Sana Javed) आपली साथीदार म्हणून निवडलं आहे. मलिकने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर दोघांचे फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली. महत्वाचं म्हणजे सानिया (Saniya Mirza) आणि शोएब यांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरु आहेत. त्यातच आता शोएबने दुसरं लग्न केल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यानी मात्र त्याला चांगलंच धुतलं आहे.

ट्विटरवर एका यूजर्सने ट्विट करत म्हंटल कि, सानिया मिर्झा ही अतुलनीय महिला तिच्या संपूर्ण देशाच्याविरुद्ध गेली आणि द्वेष आणि टीकेचा ढीग सहन करत त्याच्यासोबत राहिली. आणि त्या बदल्यात त्याने काय केले? फसवणूक करून तू तिच्या विश्वासाचा घात केला आणि हे काही योग्य नाही असं म्हणत आपला राग व्यक्त केला. तर दुसऱ्या यूजर्सने मलिकच्या लग्नावरून बाबर आझमची फिरकी घेतली. मलिकने २ लग्न केली तरी बाबर अजून सिंगलच आहे असं त्याने म्हंटल.

दरम्यान, शोएब मलिकने सानिया सोबत 2010 मध्ये लग्न केलं होते. सानियाने एका पाकिस्तानी व्यक्तीशी लग्न केल्यामुळे लोकांनी तिच्यावर तेव्हा टीकाही केली होती. खरं तर 2009-2010 मध्ये ऑस्ट्रेलियातील होबार्टमध्ये त्यांची भेट झाली होती. त्यांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि जवळपास 5 महिने एकमेकांना ओळखल्यानंतर दोघांनी 2010 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना इजहान नावाचा मुलगाही आहे. मात्र मागील १-२ वर्षात त्यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा होत्या.

दुसरीकडे सना जावेदचे सुद्धा हे दुसरं लग्न आहे. सनाने 2020 मध्ये गायक आणि गीतकार उमेर जसवाल यांच्याशी लग्न केले होते. परंतु दोघांमध्ये सार काही आलबेल नसल्याचे लगेचच उघड झालं होत. नंतर दोघांनीही सोशल मीडिया अकाउंटवरून एकमेकांचे फोटो डिलीट केले आणि त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page