
प्रकाश महाजन यांना धमकीचा मेसेज, फोन कॉल आल्यानंतर मराठवाडा पोलीस त्यांच्या घरी गेले आहेत. त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. प्रकाश महाजन यांचा नारायण राणेंसोबत शाब्दीक वाद पेटला आहे. नारायण राणे यांनी फेसबुकच्या माध्यमातून प्रकाश महाजन यांना धमकीवजा इशारा देणारी पोस्ट केली. त्याला आता प्रकाश महाजन यांनी चॅलेंज केलं आहे.
*मुंबई प्रतिनिधी-* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन आणि भाजप नेते, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील शाब्दीक वाद चांगलाच पेटला आहे. काल मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केल्यानंतर, नारायण राणे यांनी फेसबुकच्या माध्यमातून प्रकाश महाजन यांना धमकीवजा इशारा देणारी पोस्ट केली होती. यानंतर प्रकाश महाजन यांना अनेक धमकीचे फोन आले होते. आता प्रकाश महाजन यांनी थेट नारायण राणे यांना आव्हान देणारी भाषा केली आहे. त्यांनी नारायण राणे यांच्यावर अत्यंत बोचरी, जिव्हारी लागणारी टीका केली आहे. “मी नारायण राणे नावाच्या राजकीय गुंडाविरुद्ध लढायला तयार आहे. नारायण राणे मी कणकवलीत येतो, करायला लावा उलट्या. मला लेचपेचा समजू नका. माझ्या नेत्यावर टीका करणार, मी काय तुमच्या मुलावर फुले उधळू का?” असा सवाल प्रकाश महाजन यांनी केला आहे.
“उध्दव ठाकरे यांना उध्दव म्हणतो, हा तुझ्या वयाचे आहेत का ते?. तुम्हाला भिणारे दुसरे असतील, मी कुठे येऊ सांगा. दिल्ली, मुंबई किंवा कणकवलीतल्या घरी येतो. जीवाला भिलो असतो, तर एक शिक्षकाचा मुलगा राजकारणात आला नसता. नारायण राणे आता भाजपमध्ये आलेत. बाळ स्वयंसेवक आहे मी, आणीबाणी भोगलीय मी” असं प्रकाश महाजन म्हणाले. “दुर्देव आहे ज्या गोपीनाथ मुंडेंनी राज्यातील गुन्हेगारी विरोधात आवाज उठवला, त्या भारतीय जनता पार्टीत असे गुन्हेगार येऊन बसले आहेत” अशा शब्दात नारायण राणेंवर हल्लाबोल केला.
“खुलेआम संवैधानिक पदावर असताना धमक्या देत आहेत, आणि गृहमंत्री याची दखल घेत नाहीत. नारायण राणे म्हणाले होते, बाळासाहेब माझ्या जीवनात नसते तर माझा एन्काऊंटर झाला असता, सामान्य माणसांचा होतो एन्काऊंटर. नारायण राणे यांनी स्वतःच्या मुलाच्या दोन थोबाडीत मारायला पाहिजे होत्या. संघ, भाजप आणि फडणवीस यांच्याबद्दल काय बोलतात हे बापलेक काढून पहा. “गिड्ड त नू फितनतू” गिड्ड्या माणसाचा जन्मजात स्वभाव कळत नाही ही म्हण आहे मराठवाड्यात. मी क्रांती चौकात जाऊन थांबणार” असं प्रकाश महाजन म्हणाले.
*‘केंद्रीय मंत्री पदावरून तुम्हाला का काढलं ते पण सांगा’*
“राज ठाकरेंचा मी कर्यकर्ता आहे. अमित ठाकरेंसोबत माझे बोलणे झाले आहे. मी साहित्यक भाषेत बोललो तर राग आला, मी जर बीडच्या भाषेत बोललो तर काय होईल?. मी तर महाजन आहे, आमचे तोंड फाटकं आहे. केंद्रीय मंत्री पदावरून तुम्हाला का काढलं ते पण सांगावे. आमचे पण दोन- चार मित्र भाजपमध्ये आहेत” अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली.
*धमक्या देणा-यांना प्रकाश महजनांकडून आव्हान.* “आज मी क्रांती चौकात उभा राहणार आहे. ज्यांना माझे घर माहित नाही, त्यांनी क्रांती चौकात यावे आणि काय करायचे ते करावे” असं प्रकाश महाजन म्हणाले.