जीएनएमचा निकाल १०० टक्के
▪️२४ डिसेंबर/रत्नागिरी : मिरजोळे, विमानतळ येथील दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या तृतीय वर्ष जीएनएम नर्सिंगचा निकाल प्रतिवर्षाप्रमाणे १०० टक्के लागला. या परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच कॉलेज सुरू असतानाच कॅंपस इंटरव्ह्यूमधून या विद्यार्थिनींना चांगल्या पगाराची नोकरी वयाच्या २१ व्या वर्षीच उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या विद्यार्थिनींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. नर्सिंगमध्ये शिक्षण घेऊन रुग्णसेवा आणि चांगले वेतन मिळवण्याची सुवर्णसंधी आहे, हे या जीएनएमच्या बॅचने दाखवून दिले आहे.
▪️महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाने (मुंबई) तृतीय वर्ष जीएनएम परीक्षेचा निकाल जाहीर केला. यामध्ये दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम क्रमांक तीन विद्यार्थिनींना पटकावला आहे. यात तनया देवेंद्र बांदकर (71.6%), वर्षा शामराव चव्हाण (71.6%) आणि सुनीता सायाप्पा पुजारी (71.6%) यांनी प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक अंकिता शिवराम मांडवकर (71%), तृतीय क्रमांक युक्ता विनायक कांबळे (70.8%) हिला मिळाला.
▪️तृतीय वर्ष जीएनएमचा निकाल लागण्यापूर्वीच कॅंपस इंटरव्ह्यूद्वारे चांगल्या ठिकाणी नोकरीची संधी विद्यार्थिनींना मिळाली. या विद्यार्थिनींचे संबंधित रुग्णालयात प्रशिक्षण होऊन त्यांनी नोकरीलाही सुरवात केली आहे. यामध्ये क्रिटिकेअर एशिया मल्टिस्पेसिऍलिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेन्टर (कुर्ला), ज्युपिटर हॉस्पिटल (ठाणे), अपोलो हॉस्पिटल (मुंबई) येथे तब्बल २२५०० रुपये दरमहा वेतनाची नोकरी मिळाली. तसेच त्यांच्या निवास भोजनाची व्यवस्थासुद्धा तेथे करण्यात आली आहे. वयाच्या २१ व्या वर्षी नोकरीला लागलेल्या या विद्यार्थिनी जीएनएम नर्सिंग शिक्षणाने आत्मनिर्भर बनल्या आहेत. परीक्षेचा निकाल लागल्यामुळे या विद्यार्थिनींचे वेतन २६ हजार रुपये झाले आहे. कॅम्पस इंटरव्ह्यूमुळे दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग ॲड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनींना चांगली संधी मिळाली. अन्य विद्यार्थिनींनाही चांगल्या ठिकाणी नोकरी उपलब्ध झाली आहे.