यज्ञ एक शक्तिशाली साधन : राज्यपाल रमेश बैस; खारघर येथे पाच दिवसीय ‘मुंबई अश्वमेध महायज्ञ’चे आयोजन…

Spread the love

आज समाजात व्यसनाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, लहान मुले मोठ्या संख्येने त्याचे बळी ठरत आहेत.

यज्ञ एक शक्तिशाली साधन : राज्यपाल रमेश बैस; खारघर येथे पाच दिवसीय ‘मुंबई अश्वमेध महायज्ञ’चे आयोजन

नवी मुंबई : आपले पर्यावरण सर्व अशुद्धतेपासून मुक्त करण्यासाठी ‘मुंबई अश्वमेध महायज्ञ’ महत्त्वाचे आहे. पर्यावरण आणि सामाजिक जडणघडणीला धोका निर्माण करणारी अनेक आव्हाने आणि वाईट गोष्टींचा सामना करण्यासाठी, तसेच समतोल, सद‌्भाव आणि पवित्रता पुनर्संचयित करण्यासाठी हे यज्ञ एक शक्तिशाली साधन आहे. ‘अश्वमेध यज्ञ’ हा केवळ धार्मिक विधी नसून, याचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असा प्रभाव आहे, असे मत राज्यपालयांनी व्यक्त केले.

अखिल जागतिक गायत्री परिवाराच्या वतीने खारघर येथील कॉर्पोरेट पार्क या ठिकाणी आयोजित पाच दिवसीय ‘मुंबई अश्वमेध महायज्ञ’ कार्यक्रमाच्या शुभारंभावेळी ते बोलत होते.

या विशाल महायज्ञात सहभागी झालेले सर्व लोक भाग्यवान आहेत. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावण झालेली भूमी महाराष्ट्रात आहे. ही भूमी परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाची आहे. ही भूमी त्र्यंबकेश्वराची आहे. महाराष्ट्र ही संतांची आणि शूरवीरांची भूमी आहे. या भूमीला संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम, समर्थ रामदास यांच्या शिकवणुकीचे वरदान लाभले असून, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, गुरू गोविंदसिंग महाराज अशा थोर संतांची आणि वीरांचीही ही भूमी आहे, असे राज्यपाल रमेश बैस म्हणाले.

हे यज्ञ करून त्यांनी आपल्या प्रजेची समृद्धी, सुरक्षा आणि कल्याणासाठी सुनिश्चित केले होते. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत एक विकसित राष्ट्र होण्याच्या मार्गावर सातत्याने पुढे जात आहे. अश्वमेध महायज्ञाच्या माध्यमातून आपल्याला आपले अंतःकरण आणि मन हे मत्सर, द्वेष आणि अज्ञानापासून मुक्त करायचे आहे. तसेच राज्याच्या विद्यापीठांच्या कुलगुरूंना प्राचीन अश्वमेध यज्ञातील मूल्ये अंगिकारण्याचे आवाहनही राज्यपाल बैस यांनी यावेळी केले. प्रास्तवित भाषणात देव संस्कृती विश्व विद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी कुलगुरू डॉ. चिन्मय पण्डया यांनी अश्वमेध महायज्ञाचा इतिहास सांगितला. तसेच या पाच दिवसीय महायज्ञाची माहिती दिली.

आज समाजात व्यसनाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, लहान मुले मोठ्या संख्येने त्याचे बळी ठरत आहेत. अभियानाच्या माध्यमातून करोडो लोकांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला जात आहे. हे काम प्रशंसनीय असून ते प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालयात घेऊन जायचे असून, सर्व राज्याच्या विद्यापीठांच्या कुलगुरूंना आपला परिसर अमली पदार्थांपासून मुक्त ठेवण्यासाठी जागरूक राहावे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page