
मुंबई: मराठी साहित्यातील पहिल्या दलित स्त्री आत्मचरित्राच्या लेखिका शांताबाई कांबळे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 100 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले आहे. दलित पॅंथरचे नेते दिवंगत प्रा. अरुण कांबळे यांच्या त्या मातोश्री होत्या. शांताबाई यांच्या पश्चायात मुले, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, तीरमारे गुरुजी यांचा सहवास त्यांना लाभला होता. त्यांच्यावर आज कोपखैराणे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.