*आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी यंदा 17 जुलैला आहे. ही एकादशी भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवसापासून भगवान विष्णू योग निद्रामध्ये जातात. कार्तिक महिन्यात देवउठनी एकादशीच्या दिवशी जागे होतात. यावेळी भगवान विष्णू भगवान शंकराला आपले पूर्ण अधिकार देतात. जाणून घ्या आषाढी एकादशीचं महत्त्व आणि पूजेची पद्धत आहे.*
भगवान विष्णूला समर्पित या एकादशीला भगवान विष्णू योग निद्रेत जातात. या काळात भगवान शिवाची सत्ता असते. देवशयनी एकादशीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कधी आहे? पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? आषाढी एकादशीचं महत्व काय? जाणून घेऊया ज्योतिष आचार्य पंडित सुशील शुक्ल शास्त्री यांच्याकडून!
*आषाढी एकादशी कधी असते?…*
आषाढी एकादशीविषयी अधिक माहिती देत ज्योतिषी आचार्य पंडित सुशील शुक्ल शास्त्री म्हणाले, “आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी असेही म्हणतात. ही एकादशी देवशयनी एकादशी म्हणूनही ओळखली जाते. यंदा आषाढी एकादशी 17 जुलै 2024 रोजी येत आहे. या दिवसापासून सर्व प्रकारची शुभ कार्ये, विवाह थांबतील आणि चातुर्मासही या दिवसापासून सुरू होईल.”
पुढं ते म्हणाले, “आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशीची पूजा करण्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करा. विधीनुसार पूर्ण भक्तिभावानं भगवान विष्णू आणि इतर देवी-देवतांची पूजा करा. पाठ केल्यानंतर त्यांना नैवैद्य दाखवा. यानंतर भगवान विष्णूच्या मूर्तीला झोपवून त्यांची सूक्ष्म पूजा करत राहा. आपल्या घरात शंकराचं मंदिर किंवा मूर्ती किंवा शिवलिंग असेल तर त्याची विधीप्रमाणे पूजा करावी. पुढील 4 महिने भगवान विष्णू झोपी जातील. तसंच ते या काळात आपले सर्व अधिकार भगवान शंकरांना देतात. त्यामुळं विशेषत: चार महिने भगवान भोलेनाथांची वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते.”
*आषाढी एकादशी विशेष योग आणि शुभ मुहूर्त…*
आषाढी एकादशीमध्ये दोन प्रकारचे योग होत आहेत. एक शुभ योग आणि दुसरा स्वामी योग आहे. हे दोन्ही योग खूप खास आहेत. जर आपण शुभ वेळेबद्दल बोललो. तर पूजेची वेळ सकाळी 6:00 ते सकाळी 8:00 पर्यंत असेल. प्रदोष काळात सूर्योदय होताच सकाळी पूजा सुरू करा. सकाळी 11:00 ते दुपारी 1:00 वाजेदरम्यान पूजा करा. संध्याकाळी, सूर्यास्ताच्या 10 मिनिटे आधी पूजा सुरू करा. नक्षत्र उगवण्यापर्यंत पूजा चालू ठेवा. याला प्रदोष काल म्हणतात. तुम्ही आषाढी एकादशीला उपवास करता, तेव्हा गहू उकळून त्या एकादशीच्या एक दिवस आधी साखर किंवा गुळासोबत खाणं खूप शुभ मानलं जातं.