सावर्डे – ग्रामीण भागातील मुले मेहनती आहेत या मुलांच्या कडे बुद्धिमत्ता आहे त्याला सह्याद्रीच्या वतीने मार्गदर्शन देऊन पैलू पाडण्याचे काम करण्यात येत आहे.सावर्डे विद्यालयाचे विद्यार्थी प्रत्येक वर्षी जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धेमध्ये चमकतायेत याचा सह्याद्रीला अभिमान आहे.कोकणातील विद्यार्थी शिकला पाहिजे व त्याचे भविष्य उज्वल झाले पाहिजे या हेतूनेच सह्याद्रीची स्थापना झाली असून सह्याद्री सदैव या विद्यार्थ्यांच्या पाठीशी असेल असे आश्वासन विद्यार्थी गुणगौरव प्रसंगी आमदार शेखर निकम यांनी दिले.
सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकताच विद्यार्थी गुणगौरव सोहळा आमदार शेखर निकम, संस्थेचे सचिव महेश महाडिक,विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे,उपप्राचार्य विजय चव्हाण,पर्यवेक्षक उद्धव तोडकर, सर्व शिक्षक ग्रामस्थ यांच्या उपस्थित पार पडला.याप्रसंगी विद्यालयाने इयत्ता दहावी व बारावी मध्ये शंभर टक्के यश प्राप्त केले असून प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. स्कॉलरशिप,एन एम एम एस परीक्षेत गुणवत्ता यादीमध्ये स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचेही कौतुक करण्यात आले. नुकत्याच जिल्हास्तरावरती पार पडलेल्या फुटबॉल स्पर्धेत विद्यालयाच्या 17 वर्षे खालील मुलींच्या संघ उपविजेता ठरला त्यांनाही गौरवून शुभेच्छा देण्यात आल्या. जेई ई, नीट व सीईटी परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले व भविष्यात यश प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व कौतुक करताना आमदार शेखर निकम व मान्यवर