संगमेश्वर – भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब*, भाजपा *प्रदेशाध्यक्ष महिला मोर्चा सौ.चित्राताई वाघ,* जिल्हाध्यक्ष श्री. राजेशजी सावंत, महिला मोर्चा जिल्हाधक्षा सौ. सुजाताताई साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी काँग्रेस खासदार धीरज साहू यांचा संगमेश्वर(उत्तर) तर्फे जाहीर निषेध करण्यात आला.
काँग्रेसचे झारखंडमधील राज्यसभा खासदार धीरज साहू आणि मद्य निर्मिती कंपनी बलदेव साहू यांच्या समूहाशी संबंधीत आयकर विभागाने छापा घातला असता त्यामध्ये ३०० कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली. अनेक बेकायदेशीर व्यवसाय असलेले धीरज प्रसाद साहू काँग्रेसचे राज्यसभेचे ३ वेळचे खासदार राहीले आहेत.
आत्तापर्यंतचा अनुभव बघता जिथे जिथे काँग्रेसचे सरकार असेल तिथे तिथे त्या सरकारच्या माध्यमातून असे नेते जनतेची लूट करत आहेत.काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचाराला कंटाळून जनतेने भाजप सरकारला निवडून दिलं अशा या काँग्रेसच्या नेत्यांचा आम्ही भारतीय जनता पार्टी संगमेश्वर (उत्तर) यांच्या तर्फे जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी सौ.नुपुरा मुळ्ये जिल्हा सरचिटणीस महिला मोर्चा रत्नागिरी (द.), सौ. कोमल रहाटे बेटी बचाव बेटी पढाव संयोजिका रत्नागिरी (द.), सौ. सरिता आंबेकर जिल्हा चिटणीस महिला मोर्चा, चिपळूण विधानसभा क्षेत्रप्रमुख (युवा मोर्चा) श्री.अविनाश गुरव, श्री. संजय सुर्वे किसान मोर्चा तालुका अध्यक्ष संगमेश्वर उत्तर, श्री. मिथुन निकम तालुका सरचिटणीस संगमेश्वर उत्तर, श्री. राजेश आंबेकर, श्री.अजिक्यराज सुर्वे, सौ.सुमन झगडे तालुका उपाध्यक्ष, श्री. स्वप्निल सुर्वे तालुका अध्यक्ष युवा मोर्चा संगमेश्वर उत्तर,श्री.मयूर निकम आयटी सेल अध्यक्ष,श्री.मयुरेश दिवाकर मादुस्कर सोशल मीडिया संयोजक,सौ.आराध्या मयूर निकम उपध्यक्षा म.मोर्चा, श्री. विनेश चीले , श्री हेरंब भिडे ,सौ. मुग्धा प्रसाद भिडे (ग्रामपंचायत सदस्य माभळे), श्री. दिपक चाळके , श्री मुरलीधन चाळके, श्री.अभिषेक जाधव,श्री. दयानंद रहाटे, सौ. वंदना रहाटे, सौ.पूर्वा करमरकर इ. उपस्थित होते.