*मुंबई-* 5 वर्षानंतर पक्ष झोपेतून उठला आहे, त्यानंतर महाराष्ट्र दौरे चालू लागले, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी काका राज ठाकरे यांना लगावला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सोलापुरातून सुरुवात झाली असून राज ठाकरे यांनी सोलापूर दौऱ्यातूनच आपले विधानसभेचे दोन उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे, मनसेनं आगामी विधानसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी काका राज यांच्या दौऱ्यावरुन निशाणा साधला.
आदित्य ठाकरे यांनी आज महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी राज ठाकरेंबाबत त्यांना विचारणा केली असता, आदित्य ठाकरे म्हणाले की, पाच वर्षानंतर पक्ष झोपेतून उठला आहे, त्यानंतर आता महाराष्ट्रात दौरे चालतात. सुपारी पक्ष, ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू, असे म्हणत आदित्य यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्यावरुन मनसेला लक्ष्य केलं.
*मुंबईत चांगलं वाईट घडतं तेव्हा हा पक्ष कुठे?..*
कोरोना काळात असेल किंवा मुंबई चांगलं वाईट घडत असताना हा पक्ष दिसला तरी होतो का? दुपारी पक्ष तिथेच राहील, वरळीत माझ्या विरोधात मला वाटलं बायडन लढत आहेत, असा टोलाही आदित्य यांनी मनसेला लगावला. दरम्यान, यापूर्वीही आदित्य ठाकरेंनी बिनशर्ट म्हणत मनसेवर निशाणा साधला होता. तर, वरळी विधानसभा मतदारसंघात मनसेचा उमेदवार देण्यात येणार असल्याची चर्चा असते, त्यावरूनही मनसेला लक्ष्य केलं होतं.
*परराष्ट्र मंत्रीच सांगतील..*
आदित्य ठाकरेंनी बांग्लादेशमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. शेख हसीना भारतात येत असल्यासंदर्भात बोलताना, तो त्यांचा स्थानिक विषय जरी असला तरी आपल्या देशावर याचा परिणाम होऊ शकतो का, याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. आपल्या बाजूचा हा देश आहे, इमर्जिंग इकॉनॉमी होती. डोमेस्टिक नाही, पण एक्स्टर्नल अफेअर्समध्ये आपल्याला काय होऊ शकतं का? आपले परराष्ट्रमंत्रीच सांगतील, असेही आदित्य यांनी बांग्लादेश परिस्थितीवर बोलताना म्हटले.