आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस’ का साजरा केला जातो! जाणून घ्या इतिहास आणि महत्व…

Spread the love

आज ( 23 जून) रोजी जगभरात ‘आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस’ साजरा केला जात आहे. क्रीडाप्रेमींसाठी आजचा दिवस खूप खास आहे. ऑलिम्पिक खेळाचा प्रसार आणि खिलाडूवृत्ती वाढविण्याकरिता हा दिवस साजरा केला जातो.

*हैदराबाद :* जगभरात 23 जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस’ साजरा केला जातो. खेळ आणि फिटनेसला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा करतात. तसच जगभरातील खेळाडूंना सर्वोत्कृष्ट बनण्यास प्रवृत्त करण्याच्या हेतूनेदेखील हा दिवस महत्वाचा आहे. या दिवशी जगाच्या विविध भागात अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित केली जातात. यामध्ये प्रत्येक विभागातील लोक आणि खेळाडू सहभाग नोंदवतात. क्रीडाप्रेमींच्या हृदयात या दिवसाचं एक विशेष स्थान आहे.

*ऑलिंपिक दिवसाचं इतिहास:* 23 जून 1894 साली आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची स्थापना करण्यात आली. ग्रीक उद्योगपती डेमेट्रिओस विकेलस यांच्या अध्यक्षतेखाली ग्रीस, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स्वित्झर्लंड, पोर्तुगाल, ग्रेट ब्रिटन, व्हेनेझुएला, उरुग्वे आणि बेल्जियम या देशांनी एकत्रिक येऊन पहिला आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला. 1900 मध्ये भारतानं प्रथमच ऑलिंपिकमध्ये सहभाग नोंदविला होता. आयओसीचे मुख्यालय लॉसने, स्वित्झर्लंड येथे असूनन 206 ऑलिम्पिक समित्या आहेत.

*तुम्हाला माहीत आहे का ?:* ऑलिंपिक खेळांचे आयोजन दर 4 वर्षांनी केलं जातं. यात 200 हून अधिक देश सहभागी होतात. विशेष बाब म्हणजे ऑलिम्पिक देशाच्या नावाने नव्हे तर ज्या शहरामध्ये आयोजित केले जाते, त्या शहराच्या नावाने ओळखले जाते. बीजिंग ऑलिम्पिक, लंडन ऑलिम्पिक, रिओ ऑलिम्पिक इ. कॉमनवेल्थ गेम्समध्येही असंच काहीसे घडते. ऑलिम्पिक खेळाच्या चिन्हात पाच गोल असतात. यात आशिया पिवळा, अमेरिका लाल, ऑस्ट्रेलिया हिरवा, आफ्रिका काळा आणि युरोप निळा रंग दर्शवितो.

1894 मध्ये सुरू झालेल्या महायुद्धांमुळे ऑलिम्पिकचे तीन वेळा आयोजन होऊ शकले नाही. सर्वप्रथम पहिल्या महायुद्धामुळे 1916 मधील बर्लिन ऑलिंपिक रद्द करावं लागलं. 20 वर्षांनंतर 1936 मध्ये, बर्लिननं पुन्हा ऑलिम्पिकचं आयोजन केलं. हे दुसऱ्या महायुद्धापूर्वीचं शेवटचं ऑलिंपिक होतं. यानंतर 1940 मध्ये होणारे टोकियो ऑलिम्पिक दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द करावं लागलं. त्यानंतर फिनलंडमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु शेवटी युद्धामुळे रद्द करण्यात आलं. 1944 मध्ये होणारे लंडन ऑलिंपिक ही दुसऱ्या महायुद्धामुळे रद्द झाले. यानंतर 1948 मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेचं यजमानपद लंडनला मिळालं. तेथे तब्बल 12 वर्षांनंतर या खेळांचे आयोजन करण्यात आलं होतं.

*आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस 2024 ची थीम:* यावर्षी, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस 2024 ची थीम ‘लेट्स मूव्ह अॅड सेलिब्रेट’ ही आहे. ऑलिंपिक चळवळीच्या भावनेने प्रेरित, ही थीम लोकांना मार्ग त्यांच्या चळवळीचा आनंद साजरा करण्यास प्रोत्साहीत करते. निरोगी राहण्यासाठी आणि शांतता आणि विकासाला चालना देण्यासाठी खेळांच्या भूमिकेवर देखील प्रकाश टाकते. अधिकाधिक लोकांना ऑलिम्पिक खेळांमध्ये सहभागी होण्यासाठी, कार्यक्रमाबद्दल ज्ञान वाढवण्यासाठी आणि ऑलिम्पिक चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.

*पॅरिसमध्ये जुलै 2024 मध्ये ऑलिम्पिक होणार:* 2024 ऑलिम्पिक फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस शहरात होणार आहे. पॅरिसने यापूर्वी 1900 आणि 1924 मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन केले होते आणि लंडनने 1908, 1948 आणि 2012 मध्ये ऑलिम्पिकचं आयोजन केलं होतं.

*पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा कधी आहे?* 26 जुलै 2024 रोजी पॅरिस ऑलिंपिक उद्धाटन सोहळा आहे. हा सोहळा पारंपारिक स्टेडियममध्ये आयोजित करण्याऐवजी सीन नदीकाठी रंगणार आहे. 10 हजार खेळाडू अंदाजे 160 बोटीतून प्रवास करतील ट्रोकेडेरो शहरात पोहचतील. नदीकाठी असल्यामुळे अनेक ठिकणी प्रेक्षकांना हा सोहळा मोफत बघता येणार आहे. 11 ऑगस्ट रोजी ऑलिम्पिकचा शेवचा दिवस असेल. आजपर्यंत प्रथम,द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या खेडाळूंना सुवर्ण, रोप्य आणि कांस्य पदके दिली जात होती मात्र, इतिहासात पहिल्यांदाच पदक जिकणाऱ्या खेडाडुंवर पैसे दिली जाणार आहेत. जिंकणाऱ्या स्पर्धकाला 5 हजार यूएस डॉलर म्हणजेच 41.60 रुपयांचं बक्षीस रक्कम देण्यात येईल.

*पॅरिस ऑलिंपिकध्ये किती खेळ आणि कार्यक्रम होणार आहेत?* 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 39 खेळांमधील एकूण 329 स्पर्धांचे आयोजन केले जाईल. यात सर्व पारंपारिक ऑलिम्पिक खेळांचा समावेश आहे. दर चार वर्षांनी होणाऱ्या ऑलिम्पिक खेळांमध्ये जगातील अव्वल खेळाडू 50 पेक्षा कमी खेळांमध्ये सहभागी होतात.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page