दाऊद इब्राहिमवर विषयप्रयोगाची बातमी प्रथम कोणी दिली…काय म्हटले आहे त्या दाव्यात…

Spread the love

मोस्ट वॉण्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दाऊदला कराचीमध्ये विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर ही बातमी पहिला आली त्या पाकिस्तानी पत्रकाराचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली, दि.18 डिसेंबर- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर विषप्रयोग झाल्याची माहिती पाकिस्तानी सोशल मीडियातून आली. त्यानंतर पाकिस्तानमधील इंटरनेट ठप्प करण्यात आले आहे. तसेच पाकिस्तानी सोशल मीडिया प्लेटफॉर्म डाऊन झाले आहे. कारण दाऊद इब्राहिम याच्यावर विष प्रयोग झाल्याची बातमी पाकिस्तानी पत्रकार आरजू काजमी हिने आपल्या यु ट्यूब चॅनलवर सर्वात प्रथम दिली. तिने ‘भेजा फ्रॉय’ या आपल्या शोमध्ये हा दावा केला आहे. तिने यासंदर्भातील बातमी आपल्या यु ट्यूब चॅनलवर दिल्यानंतर काही तासांत हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. १४ मिनिटांच्या हा व्हिडिओ आहे. आरजू काजमी पाकिस्तानी पत्रकार आहेत.

व्हिडिओत काय म्हणते आरजू काजमी…

दाऊदला कोणी विष दिले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. परंतु ही बातमी सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. या बातमीला दुजोरा मिळत नाही. या बातमीत दुजोरा देण्याची हिंमत पाकिस्तानात कोणी करु शकत नाही. कारण ज्याने या बातमीला दुजोरा देण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर संकट कोसळणार आहे. परंतु ‘दाल मे कुछ काल है’. कारण ज्या सोशल मीडियावर लोक आपली मते व्यक्त करु शकतात ती सर्व डाऊन केली गेली आहे. पाकिस्तानात गुगल, ट्विटर, फेसबुक, यु-ट्यूब बंद आहे. कोणतेही तांत्रिक कारण कुठे नाही. मी हा व्हिडिओ करत आहे, तो अपलोड होणार की नाही? याबद्दल मला सांगता येत नाही. मी सर्व्हिस प्रोव्हीडरला फोन केल्यानंतर त्याने संपूर्ण पाकिस्तानात इंटरनेट सेवा ठप्प झाल्याचे सांगितले. त्यानंतर मी भारतातही फोन केले. त्यावेळी मला सांगण्यात आले की, दाऊदच्या बातमीनंतर पाकिस्तानातील सर्व्हर डाऊन झाले आहे.

आता सरळ मोरख्याला टार्गेट…

दाऊद सारख्या बड्या मोरख्याला प्रथमच टार्गेट केले गेले आहे. त्यानंतर आता हाफिज सईद, सय्यद सल्लाउद्दीन, मसूद अजहर या मोठ्या लोकांना आता धोका असणार आहे. कारण हे लोक मुख्य आहे. ही लोक संपूर्ण दहशतवादी संस्था चालवतात. अनेक लोकांची हत्या करतात, असे आरजू काजमी यांनी आपल्या व्हिडिओत म्हटले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page