नेमकं चुकतंय कोण? ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला नार्वेकरांनीही दिलं पुराव्यांसह प्रत्युत्तर; वाचा काय म्हणाले?..

Spread the love

ठाकरे गटानं पत्रकार परिषदेत नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड केली, यामध्ये उद्धव ठाकरेंसह सर्व नेत्यांच्या निवडीचे व्हिडिओही सादर करण्यात आले.

मुंबई : ठाकरे गटाकडून मंगळवारी पत्रकार परिषद घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाची चिरफाड करण्यात आली. यामध्ये उद्धव ठाकरेंसह सर्व नेत्यांच्या निवडीचे व्हिडिओ सादर करण्यात आले. यावरुन नार्वेकरांनी कसा चुकीचा निकाल दिला हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला. पण नंतर नार्वेकरांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगामधील शिवसेनेची सर्व कागदपत्र सादर करत ती वाचून दाखवली.

तसेच या कागदपत्रांमध्ये शिवसेनेतील घटनेच्या दुरुस्तीचे उल्लेख नसल्याचा दावा केला. पण यामुळं निवडणूक आयोगाकडं असलेल्या शिवसेनेच्या कागदपत्रांचा अर्थ नेमका कसा लावायचा? असा नवा पेच आता निर्माण झाला आहे.


नार्वेकरांनी आपली बाजू मांडताना काय म्हटलं?..

नार्वेकर पत्रकार परिषदेत म्हणाले, अपात्रतेप्रकरणीचा निकाल मी वाचून दाखवला आणि जाहीर केला. गेली सहा दिवस सातत्यानं अनेक माध्यमातून अनेक लोक विशेषतः काही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते समाजात एक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासंदर्भातील स्पष्टीकरण लोकांसमोर येणं अत्यंत गरजेचं आहे. खरंतर निकालानंतर हे स्पष्टीकरण देणं गरजेचं नाही पण लोकांमध्ये संविधानिकपदावरील व्यक्तीबाबत गैरसमज पसरवला गेला तर ते योग्य नाही. त्यामुळं मी ही पत्रकार परिषद घेत आहे.

शिवसेनेनं सातत्यानं माझ्यावर आरोप केला की, नार्वेकारांनी सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सच्या बाहेर जाऊन निकाल दिला. पण मी असं काहीही केलंल नाही. कारण पहिला मुद्दा असा होता की, असं सांगितलं४ जातं की सुप्रीम कोर्टानं २०२२ रोजी अजय चौधरी यांची निवड योग्य ठरवली होती. तसेच मी ३ जुलै २०२२ला भरत गोगावलेंचा व्हिप म्हणून आणि एकनाथ शिंदेंच्या गटनेता म्हणून नियुक्तीला अधिकृत ओळख दिली हे चुकीचं आहे. पण सुप्रीम कोर्टाची ऑर्डर अन् त्यातील काही पानं वाचली तर त्यात नेमकं काय म्हटलंय हे स्पष्ट होईल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page