नवी दिल्ली :- महिला आरक्षण हा मुद्दा मागिल काही दिवसांपासून चर्चेत आहे. आज लोकसभेत या मुद्द्यावर विरोधक तसेच सत्ताधारी पक्षांकडून भूमिका मांडण्यात आली. यादरम्यान देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत या महिला आरक्षण बिल २०२३ च्या मुद्द्यावर त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. या दरम्यान शाह यांनी आम्ही महिलांना पहिल्यांदा आरक्षण दिलं असा दावा करणाऱ्या काँग्रेस पक्षाला जोरदार प्रत्युत्तर देखील दिलं.
अमित शाह म्हणाले की, नवीन विधेयक ३०३ ए जे लोकसभेत महिलांना एक तृतियांश आरक्षण देईल, तसेच नवीन विधेयक ३३२ए जे राज्यातील विधानसभेत एक तृतियांश महिलांना आरक्षण देईल.
यासोबतच एससी आणि एसटी वर्गासाठी जितक्या जागा आरक्षित आहेत, तेथे देखील एक तृतियांश जागा या महिलांसाठी राखीव असतील असेही अमित शाह यावेळी म्हणाले. या विधेयकामुळे देशातील माता, मातृशक्ती, मुलींचा नितीनिर्धारणात देखील सहभाग वाढेल असेही अमित शाह यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, काही पक्षांसाठी महिला सशक्तिकरण एक राजकीय अजेंडा असू शकतो. काही पक्षांसाठी हा एक राजकिय मुद्दा असू शकतो. महिला सशक्तिकरण हा नारा निवडणुक जिंकण्याचं हत्यार असू शकतं पण माझ्या पक्षासाठी आणि माझे नेते नरेंद्र मोदी यांच्यासाठी महिला सशक्तिकरण हा राजकीय मुद्दा नाहीये. तो मान्यतेचा मुद्दा आहे, असेही अमित शाह यांनी सांगितेल.
पंतप्रधान मोदी हे जेव्हा भारतीय जनता पक्षात संघटनाचे काम करत होते, तेव्हा भाजपच्या गुजरात प्रांताचे संघटन महासचिव होते. तेव्हा भारतीय जनता पक्षाची वडोदरा कार्यकारणी झाली होती. त्या ऐतिहासिक कार्यकारणीमध्ये मोदींच्या भूमिकेमुळेच भाजपच्या संघटनात्मक पदांमध्ये एक तृतियांश आरक्षण महिलांना देण्यात आले होते.
मी अभिमानाने सांगू शकतो की असे करणारा माझा पक्ष सर्वात पहिला होता आणि माझा पक्षच शेवटचा असेल.
ते जेव्हा आमच्यासाठी फक्त राजकिय नाही तर कार्यशक्तीचा मुद्दा आहे. महिलांसाठी सुरक्षा, सन्मान हे मोदींनी शपथ घेतल्यापासून श्वास आणि प्राण बनले आहेत.
जेंव्हा मोदी देशाचे पंतप्रधान बनले तेंव्हा ७० कोटी लोकांच्या घरी बॅंक अकाऊंट नव्हते, मोदींनी ५२ कोटी बॅंक आकाऊंट उघडले, त्यातले ७० टक्के अकाऊंट महिलांच्या नावे काढले. काँग्रेसने या देशात पाच दशकांपेक्षा जास्त काळ राज्य केलं, पण गरिबांसाठी काही काम केलं नाही.
https://twitter.com/AmitShah/status/1704529882360008913?t=4FtbfCImS0UesVFLMmhKZg&s=19
साधी शौचालयाचीही सोय त्यांच्या काळात नव्हती, मोदींनी पहिल्या ५ वर्षातच ११ कोटी ७२ लाख शौचालये बांधले. महिलांना मोफत घरं देण्याच काम आमच्या सरकारनं केलं. १२ कोटी जनतेपर्यंत नल से जल पोहचवण्याचं काम मोदी सरकारनं केलं. जगभरात वैमानिक असलेल्या महिलांची संख्या ही ५ टक्के पण आपल्या देशात ती १५ टक्के आहे, असेही अमित शाह म्हणाले.