ठाकरे बंधू एकत्र येत असताना कोकणात शिंदे-उबाठाची हातमिळवणी, सामंतांचं पॅनल लागलं बिनविरोध…

Spread the love

रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाच्या निवडणुकीत उदय सामंत यांच्या ‘सहकार पॅनल’ने १७ पैकी १६ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. ठाकरे गटाने निवडणुकीतून माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. आमदार किरण सामंत आणि डॉ. तानाजीराव चोरगे यांनी मध्यस्थी केली.

रत्नागिरी : ठाकरे गटाकडून होतं सहकार पॅनल समोर आव्हान देत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते शिवसेनेचे नेते उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू व लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरणभैय्या सामंत, रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी खासदार व सचिव विनायक राऊत यांच्यात झालेल्या चर्चेनंतर ठाकरे गटाचे उमेदवारांनी विविध अर्ज मागे घेतल्याने सहकार बोर्डावर सहकार पॅनलची एकहाती सत्ता आली आहे. रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘सहकार पॅनल’ने १७ पैकी तब्बल १६ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे.

जिल्हा सहकारी बँकेवर व एकंदरच सहकार क्षेत्रात राजकारण आणल्यास चुकीचा संकेत जाईल यासाठी या निवडणुकीतून ठाकरे गटाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याचं सांगितलं जात आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमदार किरण भैय्या सामंत व रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी यशस्वी मध्यस्थी केली आहे. ठाकरे गटाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी उबाठा गटाने आपले सर्व उमेदवार मागे घेतल्याने सहकार सहकार पॅनलच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. यासाठी सहकार बोर्डाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्था आणि असलेले सदस्यच यासाठी निकषात बसणारे सदस्य मतदान करू शकतात यासाठी काही निकष आहेत. या सहकार बोर्डातील मतदानासाठी असलेले सदस्य शिवसेना, भाजपा,राष्ट्रवादी यांचा संपर्क मोठा आहे एकंदरच सहकार क्षेत्रात जिल्ह्यात राजकारण विरहित जिल्ह्यातील सहकार क्षेत्र असावं अशी भूमिका जिल्ह्यातील सर्वपक्ष नेत्यांनी घेतल्याने ही निवडणूक सोपी झाली.

निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाकडून सहकार पॅनलविरोधात उमेदवार उभे करण्यात आले होते. मात्र या सगळ्यांनी अर्ज मागे घेतल्याने सहकार पॅनलचे १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ठाकरे गटाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतरही अखेरच्या दिवशीही सहकार पॅनलविरोधात तीन उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवली होती. त्यामुळे यासाठी ५ जुलै २०२५ रोजी उर्वरित तीन जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान झाल्यावर लगेच मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले. जिल्हाभरातील मतदारांनी मोठ्या उत्साहात रत्नागिरीत येऊन मतदानाचा हक्क बजावला. या तीन जागांपैकी सहकार पॅनलचे नितीन कांबळे आणि सीताराम लांबोरे यांनी दणदणीत विजय मिळवला.

जिल्हा सहकारी बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष प्रभाकर शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार पॅनलने ही निवडणूक लढवली. अनेकदा बिनविरोध होणाऱ्या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता होती. सहकार पॅनलच्या निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये रामचंद्र गराटे, प्रभाकर शेट्ये, चंद्रकांत परवडी, रमेश दळवी, अविनाश जाधव, सिराज घारे, सुनील टेरवकर, प्रताप सावंत, प्रसन्न दामले, सुरेंद्र लाड, मनोज कदम, हेमंत वणजु, स्मिता दळवी आणि प्राची टिळेकर यांचा समावेश आहे.

जिल्हा सहकार बोर्डाच्या निवडणुकीतील या यशानंतर विजयी उमेदवारांचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी अभिनंदन केले. जिल्ह्यातील सहकार बोर्डाच्या या निवडणूक प्रक्रियेसाठी चिपळूण येथील अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम व अजित दादांचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ असलेले दापोली अर्बन बँकेचे जयवंत जालगावकर यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे अशी माहिती सहकार पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page