कशेडी घाटातील खड्डे कधी बुजवणार ?

Spread the love

खेड :- कशेडी घाटामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून हे खड्डे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत . आता या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कशेडी बोगद्यामधील एक लेन सुरू होण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे .
कशेडी घाटामध्ये अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत आहे . त्यात भरीसभर म्हणून मुख्य वळणावर पडलेले खड्डे हे आता जीवघेणे ठरू लागले आहेत . या खड्यांमुळे अपघातांमध्ये वाढ होत आहे . खड्डे चुकवताना होणारे अपघातही आता गंभीर बाब बनू लागले आहेत . गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे . तरीही अद्याप कशेडी बोगद्यातील एक लेन जी सुरू होणार होती ती मात्र सुरू न झाल्याने सध्याचा प्रवास कशेडी घाटातूनच तसाच सुरू आहे . त्यात कशेडी घाटात पडलेल्या खड्यांमुळे मार्गावर अपघात व वाहतूक कोंडी देखील होत असल्याने हे खड्डे बुजवणार तरी कधी ? असा प्रश्न आता प्रवाशांना पडू लागला आहे .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page