
ठाणे :- महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमच्या आमदारांवर अन्याय करत होते. ते आमच्या आमदारांना निधी उपलब्ध करून देत नव्हते. त्यामुळे आम्ही या सरकारमधून बाहेर पडलो आहोत. असं सांगत एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे आमदार बाहेर पडले होते. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांचा अजित पवार यांना जवळपास पूर्ण विरोध होता.पण आता तेच अजित पवार हे शिंदे फडणीस सरकारमध्ये सामील झाले आहेत.
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांच्या रूपाने बंड झालं असून अजित पवार हे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री बनले आहेत. अजित पवार यांच्यासोबत ९ आमदारांनी राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांना तब्बल राष्ट्रवादीच्या ३० ते ४० आमदारांचा पाठिंबा आहे.दरम्यान, बरोबर एका वर्षापूर्वी शिवसेनेतून एकनाथ शिंदे आपल्यासोबत ४० आमदारारांना आणि १० अपक्ष आमदारांना घेऊन बाहेर पडले होते. यावेळी महाविकास आघाडी सरकार पडलं आणि शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं होतं. या घटनेच्या एका वर्षानंतर राजकारणातील सर्वांत मोठी घडामोड घडली आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे आमच्या आमदारांवर अन्याय करत होते. ते आमच्या आमदारांना निधी उपलब्ध करून देत नव्हते. त्यामुळे आम्ही या सरकारमधून बाहेर पडलो आहोत. असं सांगत एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे आमदार बाहेर पडले होते. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांचा अजित पवार यांना जवळपास पूर्ण विरोध होता.पण आता तेच अजित पवार हे शिंदे फडणीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे आता अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र काम करावे लागणार असून त्यांचा पुढचा प्रवास कसा होणार याकडे लक्ष असणार आहे.