सोमय्या पिता-पुत्राने ‘विक्रांत’च्या नावावर गोळा केलेल्या पैशांचे काय झाले ?..न्यायालयाचा EOW ला सवाल…

Spread the love

*मुंबई:- हिंदुस्थानी नौदलाची भंगारात काढलेली युद्धनौका ‘आयएनएस विक्रांत’ वाचवण्याच्या नावाखाली कोट्यवधीचा निधी गोळा करून त्या पैशांचा घोटाळा करणारे भाजप नेते किरीट सोमय्या व त्यांचा चिरंजीव नील सोमय्या हे दोघे चांगलेच गोत्यात आले आहेत. सोमय्या पिता-पुत्रांनी ‘विक्रांत’च्या नावावर गोळा केलेल्या 57 कोटी रुपयांचे काय झाले, याची सखोल चौकशी करा, असे स्पष्ट आदेश मुंबई पोलिसांना देत दंडाधिकारी न्यायालयाने ‘क्लोजर रिपोर्ट’ फेटाळून लावला आहे.*

  माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून एप्रिल 2022 मध्ये घोटाळेखोर सोमय्या पिता-पुत्राविरुद्ध ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर या घोटाळ्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला होता. मात्र तक्रारदाराने गैरसमजुतीने तक्रार केली, असा अजब दावा करीत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला होता. हा रिपोर्ट अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. पी. शिंदे यांनी नुकताच फेटाळला. याचवेळी पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढत किरीट सोमय्या व नील सोमय्या या आरोपी पिता-पुत्राची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे घोटाळेखोर पिता-पुत्राबरोबर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना मोठा दणका बसला आहे.

*डोनेशन बॉक्स लावून पैसे उकळले!*

*किरीट सोमय्या, नील सोमय्या व इतर आरोपींनी मुंबईत जागोजागी ‘डोनेशन बॉक्स’ लावून लोकांकडून पैसे उकळले, असा आरोप करीत माजी सैनिक बबन भोसले यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. भोसले यांनी स्वतः 2000 रुपये दिले होते, मात्र युद्धनौका भंगारात निघाली.*

*मुंबईकरांकडून गोळा केलेले पैसे पुठे गेले?*

*आरोपी सोमय्या पिता-पुत्राने मुंबईकरांकडून कोट्यवधी रुपये गोळा केल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. तरीही घोटाळा झाला नसल्याचा पोलिसांचा दावा असेल तर मग सोमय्या पिता-पुत्राने गोळा केलेले पैसे गेले पुठे? ते पैसे राज्यपालांचे कार्यालय किंवा सरकारकडे जमा केल्याचा एकही पुरावा का सादर केला नाही? असे सवाल करीत न्यायालयाने पोलिसांचे कान उपटले आहेत.*

*घोटाळ्याचा सखोल तपास आवश्यकच*

*न्यायालयाने घोटाळ्याच्या तपासातील गंभीर त्रुटींवर बोट ठेवले आहे. या प्रकरणातील पुरावे तसेच वस्तुस्थितीचा विचार करता युद्धनौकेच्या मदतनिधी घोटाळ्याची सखोल चौकशी आवश्यकच आहे.  त्यामुळे तपास अधिकाऱ्यांनी या घोटाळ्याचा अधिक तपास करून अहवाल सादर करावा, असे आदेश अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत.*

*पोलीस तपासावर कोर्टाचे ताशेरे*

*आरोपींनी चर्चगेट रेल्वे स्टेशनसह अनेक ठिकाणी लोकांकडून पैसे गोळा केले. पण पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पैसे दिलेल्या लोकांचे जबाब नोंदवण्यासाठी पुठलीही तसदी घेतलेली दिसत नाही.* पोलिसांनी 38 लोकांचे साक्षीदार म्हणून जबाब नोंदवले. त्यातील अनेकांनी मदतनिधी म्हणून दिलेले पैसे गेले पुठे याची आपणाला कल्पना नसल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे अधिक तपास आवश्यक आहे

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page