*रत्नागिरी/ प्रतिनिधी-* मुंबई गोवा हायवे अरवली ते तळेकांटे दरम्यान काम सब कॉन्ट्रॅक्टर जे एम. म्हात्रे. कन्ट्रक्शन कंपनी करत आहेत. सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाच्या झालेल्या असून रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत. रस्त्यामध्ये मुरूम वापरायचा असूनही दगडी व साधी वापरण्यात आली आहे . गावमळ्यातील ब्रिज व जे एम म्हात्रे कंपनी यांचा यांच्या काँक्रीट प्लांट समोरचा रस्ता पूर्ण हाताने टाकण्यात आलेला आहे. तसेच म्हाबळे स्वाद हॉटेल समोरील बनवण्यात आलेला रस्ता हाताने टाकण्यात आलेला आहे. निधळेवाडी येथील रस्त्याचे काम आहे हाताने करण्यात आलेले आहे . या विषयाची लेखक तक्रार जिल्हाधिकारी व राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे देण्यात आलेली होती. परंतु कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यावर गणेश पवार हे ठाम आहेत.
▪️कॉन्ट्रॅक्टरच्या मनमानी कारभाराला अधिकाऱ्यांनी डोळे डोळेझाक का करतात…
स्थानिक लोकांची फसवणूक जे एम म्हात्रे कंपनी यांच्याकडून करण्यात आलेली आहे. सदर विषयाची लेखी पत्र देण्यात आलेले आहेत परंतु त्याच्यावर कोणतीही कारवाई संबंधित डिपार्टमेंट केलेली नाही. असे असतानाही कारवाई करण्यामध्ये दिरंगाई का होते व कॉन्टॅक्टर वर कारवाई का करण्यात येत नाही हा प्रश्न आज रोजी उपस्थित होत आहे. कॉन्ट्रॅक्टर चा मनमानी कारभार हा डोळे बंद करून बसलेले अधिकाऱ्यांमुळेच आहे.
▪️हावेचे काम चालू असताना अधिकारी किंवा एजन्सी ची माणसे का नसतात?
काम करत असताना कोणीही अधिकारी किंवा साई कन्सल्टन्स कंपनी या कंपनीचे काम आहे त्यांच्या अधिकारी काम बरोबर चालले की नाही ते तपासणे परंतु या कंपनीची लोक कधीही उपलब्ध नसतात. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरचे मनमानी कारभार चालू आहे व कॉन्टॅक्टर चुकीच्या पद्धतीने काम करत आहे. एखाद्या कंपनीला काम देण्यात येतं ती कंपनी काम करत नाही तिथं सब कॉन्ट्रॅक्ट देण्यात येते. काँक्रीट टाकण्याच्या मशीनही भाड्याने घेण्यात आलेले आहेत. कंपनीची कॅपॅसिटी नसताना काम देण्यात आले आहे. अधिकारी आमच्या हातात काही नाही असे म्हणून कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष करण्यामुळेच मुंबई गोवा हायवेचे काम रखडले आहे व निकृष्ट दर्जाचे झाले.
▪️उपोषणाच्या पत्रामधील दिलेल्या विषयांची कोणतीही कारवाई नाही ? आत्मदहनाचा इशारा…
पत्रामध्ये दिलेल्या कोणत्याही मुद्द्यावर योग्य उत्तर देण्यात आलेले नाही. कारवाई ही योग्य पद्धतीने करण्यात आलेली नाही त्यामुळे गणेश पवार हे आपल्या उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहेत. असे त्यांनी यावेळी सांगितले. अधिकाऱ्याने 15 ऑगस्ट पर्यंत समाधान कारवाई केली नाही तर आमरण उपोषण करणार व तेही न झाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा गणेश पवार यांनी दिला आहे