काय सांगता, 2 लाखांत केवळ 10 ग्रॅम सोने…देवा हा महागडा दिवस कधीच न येवो..

Spread the love

सोन्याने आताच ग्राहकांच्या जीवाला घोर लावला आहे. सोन्याची किंमत थेट 72,000 रुपयांच्या घरात पोहचल्या आहेत. तर काही सराफा बाजारात GST सह या किंमती 76,000 रुपयांच्या घरात पोहचल्या होत्या. तज्ज्ञांच्या मते ग्राहकांना 10 ग्रॅम सोन्यासाठी दोन लाख रुपये मोजावे लागू शकतात, मग कधी येईल हा दिवस महागडा?

काय सांगता, 2 लाखांत केवळ 10 ग्रॅम सोने…देवा हा महागडा दिवस कधीच न येवो

*सोने दोन लाखांचा टप्पा केव्हा भारतीयांमध्ये ^न्याबाबत एक खास प्रकारचे आकर्षण आहे. भारतात सोने हे श्रद्धा आणि संस्कृतीशी संबंधित आहे. देशात लक्ष्मी पुजनासह इतर ही काही सणांना सोन्याची पुजा केली जाते. सोन्याच्या दाग-दागिनाशिवाय सण-उत्सव आणि लग्नसोहळे पार पडत नाही. सोन्याने इतर गुंतवणुकीपेक्षा दीर्घकाळात सर्वाधिक रिटर्न दिला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, सध्या 24 कॅरेट सोने 71,598 रुपये, 23 कॅरेट 71,311 रुपये, 22 कॅरेट सोने 65,584 रुपये झाले. 18 कॅरेट 53,699 रुपये, 14 कॅरेट सोने 41,885 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 80,007 रुपये आहे.

9 वर्षांत 3 पट झाले भाव

वर्ष 2015 मध्ये सोन्याचा भाव 24,740 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. या किंमतींन तिप्पट होण्यासाठी 9 वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागला. त्यापूर्वी पण सोन्याच्या किंमती 9 वर्षांच्या कालावधीत तिप्पट झाल्या होत्या. वर्ष 2006 मध्ये सोन्याचा भाव 8,250 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यापूर्वी सोन्याच्या किंमतींना तिप्पट होण्यासाठी जवळपास 19 वर्षे लागली होती. वर्ष 1987 मध्ये सोन्याचा भाव 2,570 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्यापूर्वी सोन्याच्या किंमती तिप्पट होण्यासाठी 8 वर्षे आणि 6 महिने लागले होते.



दिनांक 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव (रुपये) तिप्पट होण्यासाठी लागलेली वर्षे-
▪️19 एप्रिल 2024 73596 8 वर्षे 9 महिने
▪️24 जुलै 2015 24740 9 वर्षे 5 महिने
▪️3 मार्च 2006 8250 18 वर्षे 11 महिने
▪️31 मार्च 1987 2570 8 वर्षे
▪️31 मार्च 1979 791.22 6 वर्षे

केव्हा वाढतो सोन्याचा भाव-

या गणिताआधारे विचार करता, सोन्याचा भाव तिप्पट होण्यासाठी म्हणजे 2 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास जाण्यासाठी किती कालावधी लागले, याचा अंदाज घ्यावा लागेल. त्यावेळी ग्राहकांना सोने खरेदीसाठी लाखो रुपये मोजावे लागतील. सोन्याच्या किंमती कधी वाढतील याचा अंदाज बांधावा लागणार. जागतिक अर्थव्यवस्था, मंदी, तेजीचे सत्र, भू-राजकीय संकट, शेअर बाजारातील घसरण, महागाईचा ससेमीरा, आर्थिक संकट यासारख्या परिस्थितीचा सोन्याची किंमत वाढण्यावर मोठा परिणाम दिसून येतो. त्यामुळे सोने हे गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठी संपत्ती ठरते. ते सर्वाधिक परतावा देते.

🔹️2 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमचा भाव केव्हा….

🔹️गेल्या 5 वर्षांचा विचार करता, रशिया-युक्रेन युद्ध,…

अमेरिका-चीनमधील ट्रेड वॉर आणि कोरोना सारख्या महामारीच्या संकटातून जग तावून सलाखून निघाले. त्यामुळे सोन्याचा भाव 40,000 रुपये प्रति 10 ग्रॅम ते 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचला. केळव 3.3 वर्षांत सोन्याने 75 टक्क्यांची उसळी घेतली. त्यापूर्वी वर्ष 2014 मध्ये सोन्याचा भाव 28,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 2018 मध्ये 31,250 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला. केवळ 5 वर्षांत 12 टक्क्यांची वाढ दिसून आली. ET च्या वृत्तानुसार, एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी (रिसर्च ॲनालिस्ट) जतिन त्रिवेदी यांनी याविषयीचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार, या हिशोबानुसार, सोने येत्या 7 ते 12 वर्षांत 2 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा गाठेल.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page