weather Update: ‘तेज’ चक्रीवादळ बनले धोकादायक, बंगालपासून तामिळनाडूपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

Spread the love

नवी दिल्ली: देशातील अनेक राज्यांच्या वातावरणात बदल होत आहे. सकाळी आणि संध्याकाळी हलकी थंडी असते. मात्र, चक्रीवादळाच्या संदर्भात हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, राजधानी दिल्लीत आज आणि उद्या धुकं कायम राहणार असल्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ आज बांगलादेशच्या किनारपट्टीवर जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. याशिवाय IMD ने मच्छिमारांना येणाऱ्या वादळाबाबत इशारा दिला आहे. IMD ने तामिळनाडू आणि ओडिशातील मच्छिमारांना समुद्रकिनाऱ्यांवर न जाण्याचे आवाहन केले आहे.

केरळ, तामिळनाडू आणि बंगालमध्ये पावसाची शक्यता

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने काही राज्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तामिळनाडू आणि बंगालमध्ये पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. याशिवाय, आज फक्त ओडिशा आणि केरळच्या उत्तर किनारपट्टीवर पाऊस पडू शकतो.

दिल्ली-NCRमध्ये हवामान कसे आहे?

दिल्ली-एनसीआरमध्ये पुढील काही दिवस धुके कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. राजधानी दिल्लीत पुढचे काही दिवस धुकं असणार असल्याचंही हवामान विभागाने म्हटलं आहे. येत्या काही दिवसांत दिल्लीत थंडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

डोंगराळ भागात बर्फवृष्टीमुळे थंडी वाढली

उत्तराखंडमध्ये केदारनाथ-बद्रीनाथसह पर्वतीय भागात बर्फवृष्टीमुळे थंडी वाढली आहे. पुढील काही दिवस उत्तराखंडमध्ये हवामान कोरडे राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. याशिवाय पश्चिम हिमालयात हलक्या पावसाचा अंदाज IMD दिला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page