“महाअर्थसंकल्पातून देवरुख-मार्लेश्वर मार्गासाठी भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल आम्ही ऋणी आहोत” – भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष रूपेश कदम

Spread the love

देवरुख | मार्च १०, २०२३.

“शिंदे-फडणवीस सरकारने आपला पहिलाच अर्थसंकल्प लोकोत्तर कसा होईल याचा आदर्श घालून दिला आहे. प्रत्येक योजना वास्तववादी, प्रत्येक विकासकाम भविष्याचा वेध घेणारे आणि प्रत्येक ठिकाणी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याने होणारे काम शाश्वत आणि गुणवत्तापूर्ण होणार याची जनसामान्यांना खात्री वाटत आहे. श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे वर्षभरात लाखो भाविक-पर्यटक भेट देतात. नोकरी-व्यवसाय आणि रोजगारासाठी तेथील लोक जवळच्या देवरूख या ठिकाणी नियमित प्रवास करतात. मात्र हा प्रवास खड्ड्यांच्या प्रभावामुळे धोकादायक झाला होता. सदर रस्त्याच्या कामासाठी मी व माझ्या सर्वपक्षीय सहकाऱ्यांनी आग्रही भूमिका घेतली. अगदी बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी आमरण उपोषणसुद्धा केले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण साहेब यांच्याकडे सतत पत्रव्यवहार सुरु केला.”

“माझ्या पत्रांची मा. चव्हाण साहेबांनी दखल घेतली. आणि श्री मार्लेश्वराकडे जाणारा मार्ग समृद्ध करण्यासाठी प्राधान्याने कामाला मंजुरी दिली. यानंतर मा. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री ना. देवेंद्र फडणवीस साहेबांनी तातडीने हा विषय अर्थसंकल्पात समाविष्ट करून घेत तब्बल २ कोटी १६ लाख रुपये उपलब्ध करून दिले. यासाठी कार्यकर्ता म्हणून त्यांचा आभारी आहे.”

“या संपूर्ण प्रक्रियेत भाजपा रत्नागिरी (द.) चे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन साहेब, तालुकाध्यक्ष मा. श्री. प्रमोद अधटराव साहेब, जिल्हा संघटन सरचिटणीस मा. श्री. राजेश सावंत साहेब, भाजयुमो जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी (द.) मा. श्री. अनिकेत पटवर्धन यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या सर्वांनी कर्तव्यभावनेतून जरी सहकार्य केले असले तरीही या कामामुळे अनेकांचे जीवन सुखकर होऊन राहणीमान उंचावणार आहे यासाठी मी या सर्वांचा अत्यंत ऋण आहे.” असे श्री. रूपेश कदम यांनी प्रतिपादन केले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page