
*वायनाड –* वायनाड हे माझ्या कुटुंबाप्रमाणे असून, येथील नागरिकांसाठी मी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारी केले. केरळमधील वायनाड येथे होणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी त्यांनी बुधवारी निवडणूक अर्ज भरला.
यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व प्रियांका यांचे पती रॉबर्ट वाद्रा आणि त्याचे पुत्र रेहान उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रियांका यांच्या प्रचारासाठी कालपेट्टा येथे भव्य रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी आठ वाजल्यापासूनच या रोडशोसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या रोड शो नंतर दुपारी वायनाडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी मेघाश्री यांच्याकडे प्रियांका यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.
प्रियांका यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर गांधी कुटुंबीयांनी वायनाड येथे भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचे जेथे सामूहिक दफन करण्यात आले त्या पुथ्थूमला येथे जाऊन मृतांना श्रद्धांजली वाहिली.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वायनाड या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
या निवडणुकीमध्ये राहुल गांधी दोन्ही मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर राहुल यांनी वायनाड मतदार संघातील खासदारकीचा राजीनामा दिला.
राहुल यांच्या राजीनाम्यानंतर या मतदार संघातून काँग्रेसकडून प्रियांका यांना उमेदवारी देण्यात येणार हे जवळपास निश्चित झाले होते. त्यानुसारच येथील पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने येथे प्रियांका यांच्या नावाची घोषणा केली होती, त्यानुसार प्रियांका यांनी आज येथून पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
‘मी वायनाडच्या नागरिकांसाठी निवडणूक लढवत आहे. मी येथील नागरिकांमध्ये ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न करेन कारण वायनाड हे माझे कुटुंब आहे.
येथे मानव आणि प्राण्यांमध्ये होणाऱ्या संघर्षावर उपाययोजना करायच्या आहेत त्याचप्रमाणे येथे सतत येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे वायनाडमधील नागरिकांचे नुकसान होते त्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा प्रयत्न करेन,’ असे 2 बोलताना सांगितले. मी माझ्या बहिणवायनाड1च्या 2च्या नागरिकांच्या सेवेची जबाबदारी देत 222आहे, असे राहुल यावेळी म्हणाले.
तर भूस्खलनाने पीडित नागरिकांसाठी काम करण्यास कटिबद्ध असल्याचेही यावेळी प्रियांका म्हणाल्या. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रियांका यांचा वायनाडमधील हा पहिला दौरा आहे.
*संसदेत वायनाडचे दोन प्रतिनिधी*
वायनाड हा देशातील एकमेव असा लोकसभा मतदारसंघ आहे. ज्या मतदारसंघाचे संसदेमध्ये दोन उमेदवार असतील, एक येथून निवडून आलेला अधिकृत प्रतिनिधी आणि दुसरा अघोषित प्रतिनिधी हे दोघेही मिळून वायनाडच्या नागरिकांसाठी काम करतील, असे म्हणत राहुल गांधी यांनी ते संसदेमध्ये वायनाडचे अघोषित प्रतिनिधी अŔसतील असे प्रियांका यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना सांगितले.