मुंबई :- : भारतीय नौदलाची क्षमता वाढवण्यासाठी महेंद्रगिरी ही नवीन युद्धनौका लाँच करण्याची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांच्या हस्ते १ सप्टेंबर रोजी मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथे या युद्धनौकेचे राष्ट्रार्पण होणार आहे. त्यानंतर, उपराष्ट्रपती माझगाव डॉक लिमिटेड च्या ‘धरोहर’ या वारसा वस्तुसंग्रहालयालाही भेट देणार आहेत.
‘महेंद्रगिरी’ ही भारतीय नौदलाच्या प्रकल्प १७ ए अंतर्गत निर्माण करण्यात आलेली सातवी युद्धनौका आहे. माझगाव डॉक लिमिटेडने ( MDL) बांधलेली ही चौथी युद्धनौका आहे.
माझगाव डॉकने अवघ्या १३ महिन्यांत युद्धनौका उभारणीचा विक्रम केला आहे. नौदलात दाखल झाल्यानंतर ‘आयएनएस महेंद्रगिरी’, असे नाव ही युद्धनौका धारण करणार असून ही देशातील आजवरची सर्वांत कमी वेळेत तयार झालेली फ्रिगेट श्रेणीतील युद्धनौका आहे.
जाहिरात
जाहिरात