बॉक्स ऑफिसनंतर ओटीटीवर धमाल करणार ‘वारिसू’, जाणून घ्या केव्हा आणि कुठे पाहू शकता विजयचा चित्रपट

Spread the love

दक्षिण भारतीय चित्रपटांनी या वर्षी बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. सुपरस्टार विजयचा ‘वारीसू’ हा चित्रपट ११ जानेवारी रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आणि त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. विजयच्या ‘वारीसू’ला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता ‘वारीसू’ ओटीटीवर सादर होण्याच्या तयारीत आहे. अहवालानुसार, चित्रपट फेब्रुवारीमध्ये ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल.

‘वारीसू’ हा एक इमोशनल फॅमिली ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये जबरदस्त अॅक्शन दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा विजय त्याच्या जुन्या स्टाईलमध्ये परतताना दिसत आहे. देशभरातील चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या या चित्रपटाबाबत काही नवीन अहवाल समोर आले आहेत. असा दावा करण्यात आला आहे की, ‘वारीसू’ लवकरच ओटीटी जगातही धमाल करेल. रिपोर्ट्सनुसार, वामशी पडाईपल्ली दिग्दर्शित ‘वारीसू’चा प्रीमियर १० फेब्रुवारी रोजी ‘अमेझॉन प्राइम व्हिडिओ’वर होणार आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

चित्रपटाची कथा एका व्यावसायिकाच्या जीवनावर आधारित आहे. विजय चित्रपटात नायकाच्या भूमिकेत आहे, तर प्रकाश राज खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहेत. प्रकाश राज यांचे विजयसोबत वैर आहे. त्यांना विजयच्या कुटुंबाचे आणि व्यवसायाचे नुकसान करायचे आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page