ठाणे प्रतिनिधी – ठाणे येथील शासकिय विश्राम गृहा मध्ये व्हाईस ऑफ मीडिया संघटनेची आढावा बैठक प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, कोकण व मुंबई विभागीय अध्यक्ष-अरुण ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली व ठाणे जिल्हा अध्यक्ष रामेश्र्वर गवई यांच्या अध्यक्षतेखालील घेण्यात आली.
यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर यांनी हॉईस ऑफ मीडिया पत्रकारांना पंचसूत्री नुसार पत्रकारांच्या उज्वल भविष्य सोबत विविध प्रकारच्या सोई सुविधा मिळाव्यात म्हणून कोणत्या पद्धतीने व्हॉइस ऑफ मीडिया जगभर काम करत आहे.या विषयी सविस्तर मर्गदर्शन केले. तसेच पत्रकारिता करताना कोणकोणते नियम व अटी पाळाव्यात पत्रकारिता कशी करावी याविषयी त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच बैठकीत विभागीय अध्यक्ष अरुण ठोंबरे यांनी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे कार्य, पत्रकारांचे अधिकार तसेच पत्रकारांसाठी विविध प्रकारच्या योजना, व संघटनेची एकता या याबद्दल मार्गदर्शन केले.यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर यांनी व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे महानगर अध्यक्षपदी तुषार रसाळ यांच्या नावाची घोषणा केली. तसेच प्रदेश कार्याध्यक्ष यांनी संघटनेमध्ये फेरबदल करत जिल्हा व तालुका कार्यकारणी बरखास्त केली, २५ ते २६ जानेवारी पर्यंत नवीन जिल्हा व तालुका कार्यकारणी जाहीर केली जाईल असे यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष पत्रकारांशी बोलताना म्हणाले. ठाणे महानगर अध्यक्ष या पदावर तुषार रसाळ यांची निवड झाल्याबद्दल ठाणे जिल्हा कार्यकारणी व्हॉईस ऑफ मीडियातर्फे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. तसेच सदर बैठकीला आलेल्या या सर्वांचे तालुका कार्यकारणी कडून पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले.यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेचे जिल्हा महासचिव मंगल डोंगरे , प्रसिद्धीप्रमुख विकास जगताप, प्रवक्ते सुरेश जगताप, प्रसिद्धीप्रमुख कल्याणी भांगरे, भुजंगराराव सोनकांबळे, दिपांकर घोष, सुदाम खारकर, रिजवान शेख,आदित्य भानुशाली, सुनील कवळे, चंद्रचूड विश्वकर्मा, जपा देवी विश्वकर्मा,अशोक शिरसाट, विजय सिंह, जितेंद्र मिश्रा, जगदीश खंबाळे, सोनल बशिरे , कैलास साबळे, सत्येन पुरी , गुलशन रामसिंगानी , निलेश घाग उपस्थित होते.
जाहिरात