रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार 9 ऑक्टोबर रोजी रात्री 0.20 वा. पनवेल रेल्वेस्थानक येथून कोकणकन्या एक्सप्रेस ने रत्नागिरीकडे प्रयाण.
सकाळी 6 वाजता रत्नागिरी रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, रत्नागिरीकडे प्रयाण.
सकाळी 6.15 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे आगमन व राखीव.
सकाळी 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून रत्नागिरी रेल्वेस्थानकाकडे प्रयाण.
सकाळी 9 वाजता रत्नागिरी रेल्वेस्थानक सुशोभिकरण कामांच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ : रत्नागिरी रेल्वे स्थानक, रत्नागिरी.)
सकाळी 10.30 वाजता रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण.
सकाळी 11 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व विशेष विमानाने मोपा (गोवा) कडे प्रयाण.