मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील केंद्रात स्थित टिळक संशोधन आणि अध्ययन केंद्रामार्फत विद्यावाचस्पती…

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | सप्टेंबर ११, २०२३.

मुंबई विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक संशोधन आणि अध्ययन केंद्र रत्नागिरी येथील केंद्रामार्फत विद्यावाचस्पती अर्थात पीएचडी सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

यामध्ये राज्यशास्त्र, पत्रकारिता, तत्त्वज्ञान, इतिहास आणि संस्कृत या विषयांचा समावेश असून उमेदवाराला संबंधित विषयामध्ये विद्यावाचस्पती अर्थात पीएचडी करण्यासाठी पदव्युत्तर पदवी व सेट किंवा नेट किंवा पेट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रत्येक विषयासाठी प्रत्येकी दोन अशी प्रवेश क्षमता निश्चित करण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाचे लोकमान्य टिळक संशोधन आणि अध्ययन केंद्र रत्नागिरी येथील विद्यापीठाच्या उपपरिसर कार्यालयामध्ये आहे.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात लोकमान्य टिळक यांचे योगदान महत्त्वाचे आहे. रत्नागिरी हे त्यांचे जन्मस्थान आहे. त्यांचे व्यक्तिमत्व बहुआयामी आणि व्यासंगी होते. लोकमान्य टिळक यांच्या कार्याचे आणि योगदानाचे निरंतर स्मरण रहावे सदरचे संशोधन आणि अध्ययन केंद्र सुरू करण्यात आले आहे. लोकमान्य टिळक यांचा राज्यशास्त्र, तत्वज्ञान, संस्कृत, पत्रकारिता अध्यात्म, गणित, कायदा आणि इतिहास यासह इतरही विषयांचा सखोल अभ्यास होता. लोकमान्य टिळकांचे विचार आणि साहित्य, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आणि सुरू केलेली वृत्तपत्रे, तसेच स्वातंत्र्य लढ्यातील योगदान या विषयांवरील संशोधनाला चालना देण्याच्या उद्देशाने विद्यावाचस्पती अर्थात पीएचडी हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील केंद्रामार्फत सुरू करण्यात येत आहे. तरी राज्यशास्त्र, पत्रकारिता, तत्त्वज्ञान, इतिहास आणि संस्कृत या विषयांमध्ये पीएचडी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थिनींनी नोंदणी करण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील केंद्रामार्फत करण्यात येत आहे. विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींना कोणतीही माहिती हवी असल्यास ९४२०२७०९११ या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या कार्यालयीन वेळात रत्नागिरी उपपरिसर, मुंबई विद्यापीठ, पी -61, एमआयडीसी मिरजोळे, रत्नागिरी या ठिकाणी इच्छुक विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती मिळवू शकतात.

सोबत गूगल फॉर्म लिंक

https://surveyheart.com/form/64f896cdbaeb001ed31ab635

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page