शेतकऱ्यांना कृषी उत्पादन वाढीसाठी, शेतीच्या कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अनुदान देणे. शेतात लागवड होणाऱ्या पिकांवर निरनिराळया किडरोगांचा प्रार्दूभाव होतो. मात्र किटकनाशक फवारणी करिता स्प्रे-पंप नसल्याने शेतकरी फवारणी करु शकत नाहीत. यासाठी शेतकऱ्यांना तसेच बचतगटांना किटकनाशक फवारणीकरिता अनुदानाने पिक संरक्षण औजारे उपलब्ध करुन देणे. अनुदान मर्यादा: हस्त/स्वयंचलित पिक संरक्षण औजारे स्वयंचलीत पिक संरक्षण औजारांवर किंमतीच्या ७५% किंवा जास्तीत जास्त रु.१० हजार एवढे अनुदान देय राहील.
योजना:
1. पिक संरक्षणासाठी अनुदान
शेतकऱ्यांना किटकनाशक फवारणीसाठी हस्त/स्वयंचलित पिक संरक्षण औजारांची खरेदीवर अनुदान.
अनुदान मर्यादा: हस्त/स्वयंचलित पिक संरक्षण औजारांवर किंमतीच्या ७५% किंवा जास्तीत जास्त रु.१० हजार एवढे अनुदान देय राहील.
2. सुधारित कृषी औजारांची खरेदीसाठी अनुदान
शेतकऱ्यांना स्वयंचलित यंत्राने चालणारी तसेच मनुष्यबळाने चालणारी विविध सुधारित कृषी औजारांची खरेदीवर अनुदान.
अनुदान मर्यादा: प्रति औजार एकूण किंमतीच्या ७५% किंवा जास्तीत जास्त.रु ५० हजार एवढे अनुदान देय राहिल.
3. सौर उर्जेवर आधारित साहित्याची खरेदीसाठी अनुदान
शेतकऱ्यांना सौर उर्जेवर आधारित साहित्याची खरेदीवर अनुदान.
अनुदान मर्यादा: सौर उर्जा साहित्य प्रति नग किंमतीच्या ७५% किंवा जास्तीत जास्त रु.२५ हजार एवढे अनुदान देय राहील.
4. कृषी क्षेत्रात प्लॅस्टिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणे
शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संच, तुषार सिंचन संच, प्लास्टिक मल्चिंग शीट, शेडनेट, पॉलिथिन पेपर व इतर प्लास्टिक, पॉलिथिन, पीव्हीसी, एचडीपीई, ताडपत्री, तोडणी व साठवणूक साहित्य (क्रेटस) इत्यादींच्या खरेदीवर अनुदान.
अनुदान मर्यादा: प्लास्टिक पॉलिथिन, एचडीईपी ताडपत्रीसाठी प्रती लाभार्थी एकूण किमतीच्या ७५% किंवा जास्तीत जास्त रु.२ हजार मर्यादेत अनुदान देय राहील.
5. पिक संरक्षणासाठी काटेरी तार/सौर कुंपणासाठी अर्थ सहाय्य
शेतकऱ्यांना पिकाचे जनावरापासून संरक्षण करण्याकरिता काटेरी तार/सौर कुंपनाची खरेदीवर अनुदान.
अनुदान मर्यादा: प्रति लाभार्थी प्रति एकर रक्कम रुपये १५ हजार किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ७५% यांपैकी कमी असेल (प्रति लाभार्थी २ एकर क्षेत्र मर्यादेत).
6. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी फूलशेती, औषधी वनस्पती, कंदमुळे लागवडीसाठी प्रोत्साहनपर अनुदान
शेतकऱ्यांना फूलशेती, औषधी वनस्पती, कंदमुळे लागवडीसाठी अनुदान.
अनुदान मर्यादा: एका शेतकऱ्यास प्रति १० गुंठे लागवडीस रक्कम रुपये १० हजार (अक्षरी रु.दहा हजार मात्र) या मर्यादेत, महत्तम २० गुंठे प्रति शेतकरी या प्रमाणात अनुदान देय राहील.
7. पद्मश्री सिंधूताई सपकाळ स्वाभिमान योजनेंतर्गत शेतकरी/शेतमजूर/बचतगट यांना भाजीपाला विक्रीसाठी साहित्य तसेच ई-कार्ट पुरविणे
शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी प्लास्टिक क्रेट्स, लोखंडी स्टॅण्ड आणि ई-कार्ट खरेदीवर अनुदान.
अनुदान मर्यादाः भाजीपाला विक्री साहित्य संच प्रति लाभार्थी एकूण खर्चाच्या ९०% किंवा जास्तीत जास्त रु.९ हजार मर्यादित अनुदान देय राहील. तसेच ई-कार्ट खरेदी करणाऱ्या बचतगटास/ ग्रामसंघांना प्रति ई-कार्ट.
जाहिरात
जाहिरात