
विकी कौशल सह अनेक मान्यवरांची उपस्थिती…
संगमेश्वर तालुक्यातील येथील कसबा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक येथे 11 मार्च रोजी सकल हिंदू समाज यांच्या मार्गदर्शनाखाली “धर्म रक्षण दिना” निमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अलौकिक गाथेसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजप चे विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री प्रमोद अधटराव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
आज सायं.६ वा भाजपच्या देवरुख कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी सदरच्या “धर्म रक्षण दिन” कार्यक्रमा बाबत श्री.अधटराव यांनी माहिती दिली. भाजपचे जेष्ठनेते माजी आमदार श्री.प्रमोद जठार यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी “सिहाच्या छाव्याची अलौकिक गाथा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे व प्रमुख सादरकर्ते प्रा. शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर यांचेसह छावा चित्रपतटात प्रमुख भूमिका सकरणारे विकी कौशल यांची देखील उपस्थिती या कार्यक्रमाला लाभण्याची शक्यता आहे. असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
तसेच शिवशाहीर यशवंत सुरेश जाधव हे शंभूराजे पोवाडा सादर करणार आहेत. कर पल्लवी डॉ.अमित शिंदे तसेच संगीत संयोजन विकास मारुती कोकाटे, दांडपट्टा श्री. चंद्रकांत साठे आणि शेवटी शंभू महाआरतीने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
*मान्यवरांची उपस्थिती*
या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री श्री नितेश राणे, पालकमंत्री श्री उदय सामंत, आमदार श्री प्रवीण दरेकर, श्री प्रमोद जठार, आमदार शेखर निकम, आमदार श्री किरण सामंत, गृहराज्य मंत्री श्री योगेश कदम उपस्थित राहणार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
*“धर्म रक्षक दिन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक कसबा येथे सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला असून यामध्ये सर्व हिंदू संघटना व शंभूराजे प्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्म रक्षण दिन समिती संगमेश्वर च्या वतीने करण्यात आलेले आहे.*