
▪️संगमेश्वर,प्रतिनिधी : मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
▪️निस्वार्थ व निर्भीड पत्रकारिता हाच आपला श्वास म्हणून पत्रकारिता करणाऱ्या आणि शब्दांना विचारांचे सामर्थ्य देणाऱ्या तमाम पत्रकार बंधू भगिनींना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .

▪️आज पत्रकार दिनानिमित्त संगमेश्वर गावातील सुपुत्र पत्रकार आणि समाजसेवक माननीय श्री.दिनेश साहेब आंब्रे यांना पत्रकार म्हणून शुभेच्छा देण्यासाठी संगमेश्वरातील महिला उपस्थित होत्या. त्यासाठी सौ. अर्चिता कोकाटे मॅडम यांनी श्री. दिनेश साहेब आंब्रे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला. दिनेश आंब्रे यांनी समाजसेवेसाठी आपलं आयुष्य झिजवलं असून त्यांना नुकताच समाजसेवेतील समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यासाठीही त्यांचं अभिनंदन करण्यात येऊन पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

▪️आज पत्रकार दिनानिमित्त संगमेश्वर तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आणि समाजसेवक श्री. दिनेश आंब्रे यांचा शाल श्रीफळ देऊन संगमेश्वरातील सामाजिक महिलांनी सत्कार केला व सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.
▪️पत्रकार दिनाचे औचित्य साधून माननीय श्री दिनेश आंब्रे यांनी संगमेश्वरातील काही महिलांचाही सन्मान केला.या महिला नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी असतात तसेच त्या महिलांनी भजनी मंडळ स्थापन केले असून संगमेश्वर पंचक्रोशीतील मंदिरामध्ये प्रत्येक सणाला त्यांचे भजन होत असते. त्यासाठी सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

▪️श्री.दिनेश आंब्रे यांनी सौ.अर्चिता कोकाटे मॅडम यांना कोल्हापूर येथील महालक्ष्मी टाइम्स यांच्यातर्फे कोरोना योद्धा म्हणून मिळालेला पुरस्कार आणि महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी होळकर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
▪️कुमारी सानिया यासीन मुजावर या विद्यार्थिनीने पैसा फंड संगमेश्वर येथे दहावीपर्यंत शिक्षण घेतले त्यानंतर पुढील शिक्षण कोल्हापूर येथे पूर्ण केले व सध्या ती कोल्हापूर येथे बीएचएमएस या वैद्यकीय क्षेत्राचे शिक्षण घेत आहे. अतिशय हुशार आणि नम्र सर्व कलेमध्ये निपुण अशा या सानियाचे कौतुक सौ अर्चिता कोकाटे मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
▪️या कार्यक्रमासाठी भजनी मंडळातील महिला सौ. सविता हळदकर सौ.जानवी चिचकर सौ.नीलम चिचकर सौ. ज्योती चिचकर आणि श्रीमती रेणुका पवार या उपस्थित होत्या.
▪️ पत्रकार दिनाचे औचित्य साधून सौ.अर्चिता कोकाटे मॅडम यांनी सर्व संघटनांच्या पत्रकार बंधू भगिनींना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.