
मुंबई:- विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या देवस्थानाला भेट देणाऱ्या भाविकांचा प्रवास आरामदायी व जलद होणार आहे. यासाठी आता लवकरच मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव अशा दोन वंदे भारत ट्रेन चालवण्याचा निर्णय होण्याची शक्यता बळावली आहे.
रेल्वे प्रशासन व सरकारकडून मे २०१४ पर्यंत देशातील लोकप्रिय तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या ३५ वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याच्या योजनेवर काम सुरु आहे. यानुसार रेल्वेने प्रस्तावही मागवला आहे. त्यानुसार (Buldhana) प्रस्ताव पाठविण्यात आले आहे. त्यामुळे आता लवकरच मुंबई आणि पुण्यातील संत गजानन महाराजांच्या भक्तांना जलद व सुखकारक प्रवास वंदे भारत ने करता येणार आहे. याबाबत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.
दोन्ही ठिकाणचे प्रस्ताव
५५४ किलोमीटर अंतराच्या मुंबई ते शेगाव आणि ४७० किलोमीटरच्या पुणे ते शेगाव रेल्वे मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रस्तावावर विचार होऊन लवकरच यावर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.