‘अंडरवर्ल्ड डॉन दाऊदने मुस्लिमांसाठी खूप काही केलंय, मला गर्व आहे’; प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या विधानाची चर्चा…

Spread the love

प्रसिद्ध क्रिकेटपटूने दाऊद इब्राहिम यांचं कौतुक केलं आहे. दाऊदने मुस्लिमांसाठी खूप काही केलं असून तुम्हाला सर्वांना दाऊद जसा वाटतो तसा तो नसल्याचंही या खेळाडूने सांगितलं आहे. नेमका कोण आहे तो आणि असं का म्हणाला जाणून घ्या.

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमधील कराची येथे लपून बसल्याचं बोललं जातं. भारतातून पळून गेलेला दाऊद पाकिस्तानमध्ये बसलाय. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील साखळी बॉम्बस्फोटामधील आरोपी असलेला दाऊदचे अजुनही भारतात नेटवर्क असल्याची दबक्या आवाजात अजुनही चर्चा होताने दिसते. दाऊदचे फक्त गँगस्टर नाहीतर मोठे क्रिकेटपटू आणि बॉलिवूडमधील स्टार्सचेसोबतही त्याचे संबंध होते याचे काही व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळतात. अशातच माजी क्रिकेटरने दाऊद इब्राहिम याचे कौतुक केलं आहे.

कोणत्या खेळाडूने केलं दाऊदचं कौतुक?…

मी दाऊदला दुबईमध्ये असल्यापासून ओळखतो, माझ्या मुलाचा विवाह त्यांच्या मुलीशी झाला आहे. माझ्यासाठी ही सन्मानाची गोष्ट असून माझी सून शिकलेली आहे. तिचे शिक्षण कॉन्व्हेंट शाळेमध्ये तर त्यापुढचे प्रसिद्ध विद्यापीठात झाले आहे. दाऊदबद्दल लोकांच्या मनात गैरसमज असून भारतातील लोक ज्याप्रकारे त्याचा विचार करतात तो तसा नाही. दाऊद समजणं सोप्प नसून नसल्याचं जावेद मियांदाद याने म्हटलं आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची एक वाईट सवय आहे, ती म्हणजे ते कोणाचंही ऐकून न घेता आपलं मत समोरच्यावर लादतो. समोरचाही बरोबर असू शकतो हे इम्रान मान्य करत नाही. त्याची चांगली गोष्ट म्हणजे त्याने लोकांनी खूप मदत केली असल्याचं जावेद मियादांद म्हणाला. एका यु ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो बोलत होता.

जावेद मियादांद याची कामगिरी…

जावेद मियांदाद याने 124 कसोटी, 233 वन डे सामने खेळले असून अनुक्रमे 8832 धावा तर 7318 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये 23 शतके तर वन डे मध्ये 8 शतके झळकवली आहेत. पाकिस्तान संघाकडून त्याने 1976 ते 1996 अशी 20 वर्षे प्रतिनिधित्त्व केलं आहे. सर्वाधिक वर्ल्ड कप खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये जावेद मियांदाद यांचा समावेश आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page