चालु आर्थिक वर्ष ३१ मार्च रोजी संपणार आहे. पण ३१ मार्च रोजी रविवार असल्याने बँकांना सुट्टी असते. पण आरबीआयने ही सुट्टी रद्द केली आहे. त्यामुळे सर्व बँका शनिवारी आणि रविवारी देखील सुरु राहणार असून दररोज प्रमाणे कामकाज होणार आहे.
रविवारी सुरु राहणार बँका, RBI ने घेतला महत्त्वाचा निर्णय..
मुंबई RBI- भारतीय रिझर्व्ह बँकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रविवार, 31 मार्च रोजी बँका खुल्या ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. RBI ने X वर ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली आहे. बँकेने म्हटले आहे की, 31 मार्च 2024 रोजी रविवार असूनही सर्व बँका खुल्या राहतील. चालू आर्थिक वर्ष 2023-24 चा शेवटचा दिवस असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
आरबीआयने काय म्हटले…
आरबीआयने म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे या दिवशी सर्व बँका खुल्या राहतील. सर्व बँकांना आरबीआयने सूचना पाठवल्या आहेत. आर्थिक वर्ष संपेपर्यंत होणारे व्यवहार त्याच वर्षी नोंदवले जाणार आहेत. त्यामुळे सर्व बँकांचे कामकाज सुरु राहणार आहे. रविवार, ३१ मार्च रोजी सर्व बँका त्यांच्या नियमित वेळेनुसार उघडतील आणि बंद होतील.
शनिवारीही सर्व बँका सुरू राहणार आहेत. NEFT आणि RTGS व्यवहारही मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहतील. सरकारी धनादेश क्लिअर करण्यासाठीही विशेष तरतूद करण्यात येणार आहे. शेअर बाजार मात्र बंद राहणार आहे.
आयकर विभागाचे कार्यालये ही सुरु राहणार…
आयकर विभागाने देखील आपली सर्व कार्यालये रविवारी खुली ठेवण्याचा निर्णय घेतला होता. गुड फ्रायडेसह शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्या विभागाने रद्द केल्या होत्या. गुड फ्रायडेमुळे आयकर विभागाने या महिन्यात येणारा लाँग वीकेंड रद्द केलाय. गुड फ्रायडे 29 मार्च रोजी आहे. 30 मार्चला शनिवार आणि 31 मार्चला पुन्हा रविवार आहे. त्यामुळे 3 दिवसांची मोठी सुट्टी होती. पण आता या तिन्ही दिवशी कामं सुरु राहणार आहेत.
आर्थिक वर्षअखेर असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 2023-24 हे आर्थिक वर्ष 31 मार्च रोजी संपतंय. त्यामुळे 29, 30 आणि 31 मार्च रोजी देशभरातील आयटी कार्यालये सुरू राहतील, असे आयकर विभागाने म्हटले आहे.