
ठाणे : प्रतिनिधी (राहुल अहिरे)
दिव्यात शिक्षण विभागाची मान्यता नसलेल्या सुमारे ४३ शाळा
असून या शाळांवर ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला खरा, मात्र यानंतरही सदर शाळा सुरू असून या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जबाबदार कोण ?नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.कारवाईनंतर सदर शाळेतील विद्यार्थी अधिकृत शाळांमध्ये वर्ग होणे अपेक्षित असताना नोंदणीकृत / मान्यता प्राप्त नसलेल्या शाळा कारवाईनंतरही सुरू राहत असतील याला नेमका कुणाचा आशीर्वाद आहे ? असा प्रश्न आता पालक वर्गातून विचारला जात आहे. आहे. सर्वाधिक अनधिकृत-शाळा या इंग्रजी माध्यमाच्या आहेत. अनधिकृत शाळा सुरु असल्यास शाळा प्रशासनाला एक लाख रुपये दंड आणि त्यानंतरही शाळा सुरु राहिल्यास १० हजार रुपये प्रति दिवशी दंड अशा कारवाईची तरतुद आहे. असे असतानाही महापालिकेकडून या शाळांवर ठोस कारवाई होत नसल्याचे दिसून आले आहे. ज्या शाळा अनधिकृत किंवा मान्यताप्राप्त नाहीत त्या कायमच्या बंद का केल्या जात नाहीत असा सवाल आता पालक वर्ग विचारत असून या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या दिव्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असल्याने पालकांमध्ये नाराजी दिसत आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीलाशिक्षण विभागाची मान्यता नसलेल्या शाळांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या दिव्यातील गोरगरीब कुटुंबातील मुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे. दिव्यातील अनधिकृत शाळांवर
शिक्षण विभागाकडून कारवाई केल्याचे सांगितले जाते. ठाणे महापालिका क्षेत्रातील दिव्यात तब्बल ४३ शाळा अनधिकृत असल्याचे आढळून आले.
दिव्यात शिक्षण विभागाची मान्यता नसलेल्या सुमारे ४३ शाळा
असून या शाळांवर ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला खरा, मात्र यानंतरही सदर शाळा सुरू असून या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जबाबदार कोण ? नुकसानीला जबाबदार कोण? असा
प्रश्न आता निर्माण होत आहे. कारवाईनंतर सदर शाळेतील विद्यार्थी अधिकृत शाळांमध्ये वर्ग होणे अपेक्षित असताना नोंदणीकृत / मान्यता प्राप्त नसलेल्या शाळा कारवाईनंतरही सुरू राहत असतील याला नेमकाकुणाचा आशीर्वाद आहे ? असा प्रश्न आता पालक वर्गातून विचारला जात आहे. आहे.
सर्वाधिक अनधिकृत-शाळा या इंग्रजी माध्यमाच्या आहेत. अनधिकृत शाळा सुरु असल्यास शाळा प्रशासनाला एक लाख रुपये दंड आणि त्यानंतरही शाळा सुरु राहिल्यास १० हजार रुपये प्रति दिवशी दंड अशा कारवाईची तरतुद आहे. असे असतानाही महापालिकेकडून या शाळांवर ठोसकारवाई होत नसल्याचे दिसून आले आहे. ज्या शाळा अनधिकृत किंवा मान्यताप्राप्त नाहीत त्या कायमच्या बंद
का केल्या जात नाहीत असा सवाल आता पालक वर्ग विचारत असून या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या दिव्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले असल्याने पालकांमध्ये नाराजी दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला शिक्षण विभागाची मान्यता नसलेल्या शाळांची संख्या वाढत आहे. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्यादिव्यातील गोरगरीब कुटुंबातील मुलांचे भवितव्य धोक्यात आले आहे. दिव्यातील अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाकडून कारवाई केल्याचे सांगितले जाते. ठाणे महापालिका क्षेत्रातील दिव्यात तब्बल ४३ शाळा अनधिकृत असल्याचे आढळून आले
जाहिरात
